Arun Govil VIDEO : साक्षात राम! अरूण गोविल यांना पाहून स्वामी जगतगुरु रामभद्राचार्य चक्क रडू लागले...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 05:16 PM2023-01-05T17:16:32+5:302023-01-05T17:18:29+5:30
Arun Govil : ‘रामायण’ या अफाट लोकप्रिय झालेल्या मालिकेत प्रभु रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल आज इतक्या वर्षानंतरही रामाच्या प्रतिमेतून बाहेर पडलेले नाहीत. अगदी इतक्या वर्षानंतरही लोक त्यांना पाहून हात जोडतात, त्यांच्या पाया पडतात.
‘रामायण’ (Ramayan) या अफाट लोकप्रिय झालेल्या मालिकेत प्रभु रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल (Arun Govil) आज इतक्या वर्षानंतरही रामाच्या प्रतिमेतून बाहेर पडलेले नाहीत. अगदी इतक्या वर्षानंतरही लोक त्यांना पाहून हात जोडतात, त्यांच्या पाया पडतात. आता अरूण गोविल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात स्वामी जगतगुरु रामभद्राचार्य अरूण गोविल यांना छातीशी कवटाळून रडताना दिसत आहेत.
अरूण गोविल यांनी स्वामी जगत्गुरू रामभद्राचार्य यांच्या संत्संगात हजेरी लावली. अरूण गोविल आले आणि येताच त्यांनी स्वामी जगतगुरु रामभद्राचार्य यांचे आशीर्वाद घेतले. अरूण गोविल यांना पाहून स्वामी भावुक झालेत. त्यांनी त्यांना छातीशी ओढले आणि कवटाळून रडू लागले.
राम जी का अभिनय करने वाला भी हम सबके लिए प्रभु का रूप हैं 🙏🏻💐
— Harsha Patel 🇮🇳 (@harshasherni) January 4, 2023
रामभद्राचार्य जी महाराज अरुण गोविल जी को गले लगा कर रो दिए🙏🏻😥 pic.twitter.com/o1raEEWWF5
स्वामी जगतगुरु रामभद्राचार्य यावेळी प्रचंड भावुक झालेले दिसले. जणू साक्षात प्रभुरामचंद्राला भेटतोय, अशा पद्धतीने स्वामी अरूण गोविल यांना भेटले. ‘तू अभिनय करायचास... या डोळ्यांत मला रामजींचं रूप दिसायचं,’ असं स्वामी म्हणतात. यावर, सगळी तुमची कृपा..., असं अरूण गोविल म्हणतात. मध्यंतरी अरूण गोविल यांना पाहून एक महिला इतकी भावुक झाली होती की, तिने विमानतळावर त्यांच्यापुढे लोटांगण घातलं होतं. एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
80 च्या दशकात आलेल्या ‘रामायण’ या मालिकेइतकी लोकप्रियता खचितच कुण्या मालिकेला मिळाली असेल. मालिकेतील कलाकारांना आजही अनेक लोक देवासारखे मानतात. या मालिकेत अरूण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली ही भूमिका इतकी अफाट गाजली की, लोक चक्क घरामध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो लावू लागले होते. आजही अरूण गोविल यांच्या लोक पाया पडतात, एकंदर काय तर या मालिकेने अरूण गोविल यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.