जान्हवी किल्लेकर अन् छोटा पुढारीचं मजेशीर रील व्हायरल, व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:14 IST2024-12-18T12:13:30+5:302024-12-18T12:14:48+5:30
जान्हवी किल्लेकर अन् छोटा पुढारीचं मजेशीर रील बनवलं आहे.

जान्हवी किल्लेकर अन् छोटा पुढारीचं मजेशीर रील व्हायरल, व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती!
'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या सीझनने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ते कीर्तनकार यांसारखे स्पर्धक या पर्वात पाहायला मिळाले. त्यातील प्रत्येकाने आपआपल्या स्टाईलने प्रेक्षकांच्या आपली छाप पाडली. 'बिग बॉस मराठी' संपलं असलं तरी त्यातील स्पर्धक नेहमी चर्चेत असतात. सध्या 'टास्क क्वीन' जान्हवी किल्लेकर आणि 'छोटा पुढारी' घनःश्याम दरोडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
जान्हवी किल्लेकर आणि घनःश्याम दरोडे याच्यावर 'पुष्पा २' (Pushpa 2 The Rule)फिव्हर पाहायला मिळाला. त्यांनी 'पुष्पा २ द रुल'मधील 'अंगारों' गाण्यावर व्हिडीओ रील बनवला. या रीलमध्ये जान्हवी, घनःश्याम आणि अभिनेता अक्षय वाघमारे दिसत आहेत. "सुरुवातीला मात्र लोकांच्या मनासारखं झालंय...", असं कॅप्शन देत जान्हवी किल्लेकरने हा मजेशीर रील शेअर केला आहे. या रिलवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडियावर जान्हवी किल्लेकर आणि घनःश्याम दरोडे हे कमालीचे सक्रीय असतात. त्याच्या वैयक्तिक आयुष्यबाबत ते याद्वारे चाहत्यांना अपडेट्स देत असतात. जान्हवी बिग बॉसनंतर विविध सिनेमांच्या प्रमोशन इव्हेंटला हजेरी लावताना दिसतेय. जान्हवीच्या नव्या मालिकेची किंवा सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. तर काही दिवसांपुर्वीच घनःश्यामने 'बिग बॉस' मधून मिळालेल्या पैशातून जमीन खरेदी केली आहे. श्रीगोंदा येथे तालुक्याच्या ठिकाणी त्यानं जागा खरेदी केली आहे.