'मला ट्रॉफी मिळो न मिळो पण...'; जान्हवीचं निक्कीबद्दल मोठं विधान! पॅडी कांबळेने दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:11 AM2024-09-13T10:11:13+5:302024-09-13T10:14:06+5:30

बिग बॉसच्या घरात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने निक्की तांबोळीबद्दल केलेलं मोठं विधान चर्चेत आहे (bigg boss marathi 5)

jahnavi killekar big statement about nikki tamboli paddy kamble give support bigg boss marathi 5 | 'मला ट्रॉफी मिळो न मिळो पण...'; जान्हवीचं निक्कीबद्दल मोठं विधान! पॅडी कांबळेने दिला पाठिंबा

'मला ट्रॉफी मिळो न मिळो पण...'; जान्हवीचं निक्कीबद्दल मोठं विधान! पॅडी कांबळेने दिला पाठिंबा

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये विविध स्वभावाची माणसं बिग बॉसचं घर गाजवताना दिसत आहेत. सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार हे सोशल मीडिया स्टारही सहभागी आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या आणखी एका स्पर्धकाची चर्चा आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवीने सर्वांना एक मोठी गोष्ट सांगितलीय. त्यामुळे जान्हवीला इतरांनीही पाठिंबा दिलेला दिसला.

जान्हवीचं निक्कीबद्दल मोठं विधान

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पाहायला मिळालं की, एकमेकींच्या जिगरी मैत्रिणी असलेल्या जान्हवी - निक्की आता मात्र एकमेकींच्या शत्रू झाल्या आहेत. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोत जान्हवी बोलताना दिसते की, "मला ट्रॉफी मिळो न मिळो मला निक्कीचा गर्व उतरवायचाय." हे ऐकताच पॅडी जान्हवीच्या म्हणण्याला समर्थन देताना दिसतो. "हतबल झालीय ती", असं म्हणत पॅडी कांबळेने जान्हवीच्या म्हणण्याला सपोर्ट केलाय. 


कॅप्टनसी टास्क रद्द झाला?

याच प्रोमोत पाहायला मिळतं की, DP दादा अंकिता आणि पॅडीसोबत बसलेला दिसतो. त्यावेळी DP दादा बोलतो की, "यावेळी तरी कॅप्टनसी मिळेल असं वाटत होतं पण हे राडे सुरु झाले. हातातोंडाशी यावेळी कॅप्टनसी दिसत होती." अशाप्रकारे DP ने त्याच्या मनातली खंत व्यक्त केली. या चर्चेवरुन असं पाहायला मिळतं की, कॅप्टनसी टास्क रद्द झालाय. कारण आर्याने निक्कीच्या कानाखाली लगावल्याने मोठा राडा झाल्याने बिग बॉसने कॅप्टनसी टास्क रद्द केलेला दिसतोय.

 

Web Title: jahnavi killekar big statement about nikki tamboli paddy kamble give support bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.