'तुला कोण मराठी जनता ओळखत नाही म्हणून...'; जान्हवीचं निक्कीला खुलं आव्हान, पुन्हा उडाला वादाचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:43 PM2024-09-13T12:43:26+5:302024-09-13T12:43:45+5:30

बिग बॉस मराठीच्या घरात आज जान्हवी आणि निक्कीमध्ये मोठा वाद पेटला आहे (bigg boss marathi 5)

jahnavi killekar open challenge to nikki tamboli in bigg boss marathi 5 | 'तुला कोण मराठी जनता ओळखत नाही म्हणून...'; जान्हवीचं निक्कीला खुलं आव्हान, पुन्हा उडाला वादाचा भडका

'तुला कोण मराठी जनता ओळखत नाही म्हणून...'; जान्हवीचं निक्कीला खुलं आव्हान, पुन्हा उडाला वादाचा भडका

'बिग बॉस मराठी'मध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडत असतं. या आठवड्यात बिग बॉस मराठीमध्ये सदस्यांमध्यो होणाऱ्या भांडण आणि वादाने टोक गाठलंय. कालच टास्क खेळता खेळता रागाच्या भरात आर्याने निक्कीच्या कानफडात लगावली. अशातच आज निक्की आणि जान्हवीमध्ये वादाची ठिणगी पेटताना दिसणार आहे. दोघींमधला वाद टोकाला जाऊन जान्हवीने निक्कीला खुलं आव्हान दिलंय.

जान्हवीने निक्कीला दिलं खुलं चॅलेंज

 निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरची घट्ट मैत्री सुरुवातीचे काही दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पण नंतर त्यांच्या मैत्रीत फूट पडली. आता त्यांच्यात जोरदार वादावादी झालेली पाहायला मिळणार आहे. कॅप्टनसीवरुन निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भडका उडाला आहे. दोघी एकमेकांना चॅलेंज देताना आजच्या भागात दिसतील. समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणतेय,"दम असेल तर मला बाहेर काढून दाखव..चॅलेंज आहे". त्यावर निक्की म्हणते,"कॅप्टनसीमधून तिला काढलं याचा राग आलाय तिला". जान्हवी पुढे म्हणते,"तुला कोण ओळखत नव्हतं ना मराठी जनता म्हणून आलीस या शोमध्ये. या घरात सगळ्यांना तू घाण झाली आहेस". 


अरबाज आणि वैभव करतायत जान्हवीबद्दल चर्चा

अशातच दुसरीकडे अरबाज-वैभवमध्ये जान्हवीबद्दल चर्चा होताना दिसतेय. वैभव अरबाजला म्हणतोय,"आता तू माझं दुसरं रूप बघशील. जान्हवीने माझ्यावर आरडाओरडी केली. टास्कदरम्यान तिने मला खूप इरिटेड केलं आहे. मला खूप काही बोलली. जान्हवी आपल्यासाठी खेळतेय हे माझ्या मनात आलं नाही". वैभव पुढे अरबाजला सांगतो जान्हवीने माझ्यासाठी खेळण्याला होकार दिला होता. अरबाज पुढे म्हणतो,"वैभवला उडवायचं असं ती सगळ्यांना म्हणाली होती"

Web Title: jahnavi killekar open challenge to nikki tamboli in bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.