"आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन दमले..", जान्हवीची जीभ पुन्हा घसरली! पॅडीच्या अभिनयावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 08:39 AM2024-08-21T08:39:17+5:302024-08-21T08:39:53+5:30
जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेच्या अभिनयावर टीका केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला (bigg boss marathi 5)
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल मोठा राडा झालेला बघायला मिळाला. काल 'सत्याचा पंचनामा' हा टास्क घरात झाला. या टास्कमध्ये सदस्यांनी प्रत्येकाच्या मताला असहमती दिल्याने त्यांना कोणतीही बीबी करन्सी मिळवता आली नाही. पुढे टास्क झाल्यावर जान्हवी चांगलीच भडकलेली दिसली. तिने पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळेच्या अभिनयावरुन टीका केली. त्यामुळे सदस्य चांगलेच भडकलेले दिसले. त्यामुळे नेटकरी जान्हवीवर चांगलेच नाराज झालेले दिसले.
जान्हवीची पॅडीवर टीका, पॅडीने दिलं हे उत्तर
जान्हवी टास्क झाल्यावर मोठ्या आवाजात पॅडी कांबळेला उद्देशून म्हणाली, "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत." पॅडीने हे ऐकलं. तो आतमध्ये वर्षा उसगावकर आणि अंकिता वालावरसोबत बसला होता. पॅडी म्हणाला, "ती आपल्या अॅक्टिंगबद्दल वगैरे बोलते. तिला बाहेर आल्यावर इतकं भोवेल ते. तिला खूप त्रास होईल. एका इंडस्ट्रीत आहोत कधी ना कधीतरी क्लॅश होणार. मला आशा आहे की तिला कळेल की पॅडी कांबळे असेल तर मी काम नाही करणार. मी देवाकडे याविषयी प्रार्थना करतो."
आर्या जान्हवीवर भडकली
पुढे आर्याने हे ऐकताच तिने जान्हवीवर राग काढला. ती जान्हवीला म्हणाली, "तू आता पॅडीदादाच्या अभिनयाबद्दल काय बोलली पुन्हा रिपीट कर. जेवढी अॅक्टिंग तू नसेल केली ना तेवढी अॅक्टिंग त्यांनी याआधी केलीय. त्यांनी इतकी वर्ष थिएटर केलंय, काम केलंय. तुझ्यासारखं नाहीय. उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नको. इथे आधीच खूप घाण करतेय. करिअरबद्दल घाण ऐकून घेणार नाही. " आर्या बोलत असताना जान्हवी कान साफ करत होती. हे जेव्हा पॅडीला कळलं तेव्हा तो आर्याला घेऊन जायला आला. जान्हवीच्या या कृतीचा नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून तिच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केलीय. जान्हवीने काहीच दिवसांपूर्वी वर्षा उसगांवकर यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल त्यांच्यावर टीका केली होती.