'द व्हॉईस इंडिया किड्स'मध्ये जय भानुशाली आणि पलक मुछालची जमली गट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 06:02 AM2017-12-11T06:02:03+5:302017-12-11T11:32:03+5:30
'द व्हॉईस इंडिया किड्स'चा निवेदक जय भानुशालीची शब्दांशी खेळण्याची एक वेगळी शैली आहे आणि त्याची डॅशिंग पर्सनालिटी आकर्षक बोलण्यामुळेच ...
' ;द व्हॉईस इंडिया किड्स'चा निवेदक जय भानुशालीची शब्दांशी खेळण्याची एक वेगळी शैली आहे आणि त्याची डॅशिंग पर्सनालिटी आकर्षक बोलण्यामुळेच प्रेक्षक आणि लहान मुलांमध्ये तो प्रसिद्ध आहे. या शनिवार आणि रविवारच्या भागात फक्त आणि फक्त पलक मुछालचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो वेगवेगळे स्टंट्स करून स्वतःसाठीच एक नवा पायंडा तयार करणार आहे.भागाच्या सुरुवातीपासूनच जय प्रेक्षकांना मस्तीच्या मूडमध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर तो सतत सुंदर मार्गदर्शक पलकवर छाप पाडण्यासाठी तिची प्रशंसा आणि मस्करी करताना दिसणार आहे. पण पलक मात्र त्याच्याकडे अजिबात लक्ष देणार नसून त्याला दुर्लक्षित करणार आहे. तिचे मन जिंकण्याची पूर्ण तयारी करून आलेला हा निवेदक ही गोष्ट अजिबात स्वीकारायला तयार नसतो. ‘इच्छा तिथे मार्ग’ या प्रसिद्ध म्हणीप्रमाणेच जय मिळेल ती संधी साधून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. जय आणि पलकची ही प्रेम – द्वेषाची नोकझोक पाहून हिट आणि हॅंडसम मार्गदर्शक हिमेश रेशमियाने शोचे ‘टॉम अॅण्ड जेरी’ असेनामकरण करण्याचा निर्धार करताच हिमेशच्या या वक्तव्यावर पलक आणि जय दोघांचाही चेहरा लाल झालेला बघायला मिळणार आहे.या सर्व मजेशीर बोलण्यानंतरही, पलकवर छाप पाडणे जयला शक्य होत तर नाहीच, शिवाय तिने ‘भैय्या’म्हटल्यामुळे त्याचे मन दुखावले जाते. यावेळी जयचे सगळे प्रयत्न अयशस्वी होतात,अशी मजामस्करी भविष्यातदेखील आपल्याला बघायला मिळेल अशी आशा आहे.ही सगळी मजा आणि अफलातून धमाल अनुभवता येणार आहे.
'व्हॉइस इंडिया किड्स'चे दुसरे पर्व ११ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे.दिव्यांग मुलांमधील प्रतिभेला संधी देण्यापासून ते भारताच्या दुर्गम भागांतील मुलांच्या आजवर कधीही ऐकिवात न आलेल्या संघर्षाचे कौतुक करण्यापर्यंतच्या कित्येक कहाण्या व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वातून उलगडणार असून भारतील प्रतिभावान युवा गायकांनी जपलेले त्यांची कला पाहणे रंजक ठरत आहे.