वर्षा उसगावकरांचा पुन्हा अपमान, यावेळी जान्हवीकडून! जय दुधाणेचा राग अनावर म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:43 AM2024-08-03T11:43:44+5:302024-08-03T11:44:18+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये वर्षा उसगावकरांचा पुन्हा अपमान झालेला दिसला. त्यामुळे बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक जय दुधाणेने सोशल मीडियावर संपप्त पोस्ट लिहिली आहे (bigg boss marathi 5)

Jai Dudhane lashes out at Nikki Tamboli and janhavi killekar for insult varsha usgaonkar | वर्षा उसगावकरांचा पुन्हा अपमान, यावेळी जान्हवीकडून! जय दुधाणेचा राग अनावर म्हणाला-

वर्षा उसगावकरांचा पुन्हा अपमान, यावेळी जान्हवीकडून! जय दुधाणेचा राग अनावर म्हणाला-

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये गेल्या पाच दिवसात चांगलाच कल्ला झालेला दिसतोय. अनेक स्पर्धकांमध्ये तुफान भांडणं आणि राडे झालेले पाहायला मिळत आहेत. काल बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा वर्षा उसगावकरांचा अपमान झालेला दिसला. जान्हवी किल्लेकरने रात्री कुठे झोपायचं या गोष्टीवरुन वर्षाताईंसोबत वाद घेतला. त्यामुळे निक्कीने वर्षा उसगावकरांचं अंथरुणसुद्धा बाजूला केलं. शेवटी बाथरुम एरियात अभिजीत सावंतने जान्हवीला तिची चूक दाखवली. एवढ्या दिग्गज अभिनेत्रीसोबत असं वागणं चुकीचं आहे, यावरुन बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक जय दुधाणेने जान्हवीवर संतप्त पोस्ट केलीय. 

जय दुधाणेचा राग अनावर

जय दुधाणे सोशल मीडियावर पोस्ट केलीय. यात तो म्हणालाय, "जान्हवी महाराष्ट्राच्या सुपरस्टार अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासोबत कशी वागली, हे तिला दाखवून दिल्याबद्दल अभिजीत सावंतला हॅट्स ऑफ! ही खूप अनादरपूर्वक आणि तिरस्कारपूर्वक गोष्ट आहे. मी सुद्धा घरात भांडणं केली. पण मला आठवतंय की आमच्या सीझनमधील कोणाही स्पर्धकाने सीनियर व्यक्तीचा अनादर केला नाही."  याशिवाय जयने जान्हवीवर 'बुगू बुगू' अशी टीकाही केलीय.


 

जय दुधाणेने निक्की तांबोळीलाही झापलं

जय दुधाणेने निक्की तांबोळीलाही चांगलंच सुनावलं आहे. जय लिहितो, "निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात वाईट कंटेस्टंट." अशा शब्दात जय दुधाणेने निक्कीवर राग व्यक्त केलाय. वर्षा उसगावकरांचा वारंवार निक्कीकडून अपमान केला जातोय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राकडून संताप व्यक्त केला जातोय. आज विकेंड का वारमध्ये रितेश देशमुख याप्रकरणी इतरांना कसं सुनावणार, हे पाहावं लागेल.

Web Title: Jai Dudhane lashes out at Nikki Tamboli and janhavi killekar for insult varsha usgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.