सध्या काय करतेय जय मल्हार' मालिकेतील म्हाळसा ?, जाणून घ्या तिच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 08:00 AM2021-05-16T08:00:00+5:302021-05-16T08:00:02+5:30
'जय मल्हार' या पौराणिक मालिकेतून अभिनेत्री सुरभी हांडे घराघरात लोकप्रिय झाली.
'जय मल्हार' या पौराणिक मालिकेतून अभिनेत्री सुरभी हांडे घराघरात लोकप्रिय झाली. सुरभीने या मालिकेत म्हाळसाची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला रसिकांना भरभरून पसंती दिली होती. त्यानंतर सुरभी 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेत झळकली होती. याशिवाय ती अग्गं बाई अरेच्चा 2 या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत पहायला मिळाली होती. आज आपण म्हाळसा देवीची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडे बद्दल थोड जाणून घेऊयात.
सुरभीचा 20 मे 1991 ला भंडारा येथे झाला होता व नंतर तिचे बालपण जळगाव या शहरात गेले होते. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण तीने जळगाव येथेच पूर्ण केले. नंतर तीने पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेली. सुरभी अवघ्या 16 वर्षाची असताना स्वामी या नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.
नंतर तिने स्टँड बाय या हिंदी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण तिला खरी ओळख मिळाली ती जय मल्हार मालिकेमुळे. त्यानंतर आंबट गोड या मालिकेतून देखील ती दिसून आली.... तसेच लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत देखील सुरभीने उत्तम अभिनय केला होता. सध्या सुरभीचा एक गाणे गातानाचे काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आहे. आपल्या सुरेल आवाजात सुरभी एक अजनबी, हसीना से, यूँ मुलाकात, हो गई फिर क्या हुआ, ये ना पूछो, कुछ ऐसी बात, हो गई हे गाणं गाताना दिसतेय. सध्या सुरभी परत एकदा सोशल मीडियावर ॲक्टिव झाली असून नेहमी काहीतरी पोस्ट करताना दिसून येत आहे.
---