'आजही जेजूरीला दर्शन घेतो तेव्हा..'; 'जय मल्हार' फेम देवदत्त नागेने जागवली भावूक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 11:37 AM2024-05-19T11:37:49+5:302024-05-19T11:38:24+5:30

'जय मल्हार' मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेता देवदत्त नागेने भावूक आठवण सर्वांना सांगितली आहे (jai malhar, devdatta nage)

jai malhar fame devdatta nage emotional post about serial and co actor atul abhyankar | 'आजही जेजूरीला दर्शन घेतो तेव्हा..'; 'जय मल्हार' फेम देवदत्त नागेने जागवली भावूक आठवण

'आजही जेजूरीला दर्शन घेतो तेव्हा..'; 'जय मल्हार' फेम देवदत्त नागेने जागवली भावूक आठवण

झी मराठीवरील 'जय मल्हार' मालिका सर्वांना आठवत असेलच. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. महेश कोठारेंच्या कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिकेत खंडोबाची भूमिका साकारली अभिनेता देवदत्त नागेने. 'जय मल्हार'मालिकेला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देवदत्तने मालिकेतील एका कलाकाराची भावूक आठवण जागवली आहे.

देवदत्त नागेने सोशल मीडियावर 'जय मल्हार' मालिकेतील काही फोटो पोस्ट करुन लिहिलंय की,  "प्रति... अतुल अभ्यंकर.. अतुल... आज 18 May 2024! 18 May 2014, 7pm la  Zee मराठी वर आपल्या "जय मल्हार” चा पहिला Episode प्रक्षेपित झाला.... आणि श्री खंडेराया चरणी आपली सेवा रुजू झाली!, आज तुझी प्रकर्षाने आठवण येत आहे रे... देवयानी मालिके मध्ये आपली ओळख आणि लगेच ऋणानुबंध' तुझी अचानक Exit अतिशय दुःखदायी होती! पण तरीही आपल्या सेट वर, आपल्या Make Up Room मध्ये तुझं अस्तित्व सतत जाणवत होतं !"

देवदत्त पुढे लिहितो, "अजूनही श्री क्षेत्र जेजुरीला, जेव्हा श्री हेगडी प्रधान ह्यांचे दर्शन घेतो तेव्हा..... तुझाच चेहरा समोर असतो रे अरे आज तु असतास तर आपल्या "जय मल्हार” मालिकेच्या च्या दशक पूर्तीला सोन्याची झालर असती! अतुल... जय मल्हार ची ही दशकपुर्ती तुला समर्पित आहे, जय मल्हार." देवदत्तच्या या पोस्टवर अनेकांनी पसंती दर्शवत  'जय मल्हार' मालिकेची आठवण जागवली आहे.

Web Title: jai malhar fame devdatta nage emotional post about serial and co actor atul abhyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.