"दहशतवादी ७-८ महिने इथे कसे राहतात?", जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर, उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:40 IST2025-04-23T12:35:56+5:302025-04-23T12:40:37+5:30

अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री मेघा घाडगेनेदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना मेघाला अश्रू अनावर झाले. 

jammu kashmir pahalgham terror attack megha dhade gets emotional | "दहशतवादी ७-८ महिने इथे कसे राहतात?", जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर, उपस्थित केले प्रश्न

"दहशतवादी ७-८ महिने इथे कसे राहतात?", जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर, उपस्थित केले प्रश्न

जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्लेखोर दहशतवादी ८ ते १०च्या संख्येतील असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नावे विचारली आणि विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यात नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 

सोशल मीडियावरही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री मेघा घाडगेनेदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना मेघाला अश्रू अनावर झाले. 

नमस्कार, मी अभिनेत्री मेघा धाडे. आज सर्वांशी काहीतरी बोलायला आली आहे. काल काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात निष्पाप असलेले काही पर्यटक मारले गेले. आणि जे गेलेत त्यांचा दोष फक्त एवढाच होता की ते हिंदू होते. एका हिंदू बहुसंख्य राष्ट्रामध्ये हिंदू मारला जातोय कारण तो हिंदू आहे. हा दोष आहे? हा गुन्हा आहे? काय चाललंय? आणि का आणि कशासाठी चाललंय? यांना इतकी हिंमत कोण देतं की आपल्या देशात येऊन इथल्या निष्पाप नागरिकांना मारुन निघून जाणं. कोणीची फूस आहे? कोणाचा हात आहे? मान्य आहे की काल ज्यांनी हे हत्याकांड केलं ते लष्करी तोयबाचे पाकिस्तानी दहशतवादी होते. पण, ते इथवर कसे पोहोचतात. ६-८ महिने इथे कसे राहतात?कोणाच्या छत्रछायेखाली असतात? फक्त पाकिस्तानातच नव्हे तर बांगलादेशातील हिंदू बांग्लादेशातून हकलला जातो, मारला जातो. त्यांचा काय दोष आहे? ते हिंदू आहेत म्हणून? कोण देतं या लोकांना एवढी ताकद...की ते एका हिंदू राष्ट्रात...हो हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच असलं पाहिजे. यावर माझं ठाम मत आहे. घुसखोरांचं राज्य किंवा राष्ट्र नाही. कोण घुसवतंय यांना देशात आणि कोण त्यांचं पालनपोषण करतं? कोण त्यांचे नकली आधार कार्ड बनवतं?

 

एक है तो सेफ है हा नारा या मूर्ख सेक्युलर लोकांना सांप्रदाय वाद वाटतो. सेक्युलर हा शब्द मला एका गलिच्छ शिवीसारखा वाटतो. कोण आहेत ते लोक जे म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो. दहशतवादी फक्त दहशतवादी असतो...नाही..दहशतवादाचा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मुसलमान. हेच लोक या देशाला तोडत्यात. किती दिवस हे सगळं सहन करणार? कर्नाटक, केरळ, बांगलादेश, काश्मीर...बघा हिंदूंची काय अवस्था केली जातेय. आणि तरीही हे बघूनही तुमचं रक्त खवळत नसेल तर नपुंसक आहात तुम्ही...आजही हिंदूना भाईचारा इतका प्रिय असेल. तर तुम्ही कुठेतरी जाऊन जीव द्या. मूर्ख सेक्युलर लोक तुम्ही देशाचा नाश करत आहात...त्या लोकांना तुम्ही सपोर्ट करताय...जे या दहशतवाद्यांची सॉफ्ट पॉवर बनले आहेत. जे या दहशतवाद्यांना आपल्या देशात घुसवतात. कारण, यांना सत्ता हवीये. सत्तेसाठी हिंदूंचं रक्त वाहवाल तुम्ही...बस झालं..आजही तुम्ही एकवटला नाहीत तर हे असंच होत राहणार.

आज इथे महाराष्ट्रात आपण सुरक्षित आहोत. पण, १४ वर्षांपूर्वी असा एक काळ होता जिथे आपण सुरक्षित नव्हतो. मुंबईतही असे भ्याड हल्ले झाले होते. तेव्हा आपण काहीच केलं नाही. गप्प बसलो. किती दिवस गप्प बसणार आहात तुम्ही? जोवर तुमच्या घरातलं कोणी जात नाही तोवर? तुमचा जीव जात नाही तोवर? काय करणार आहात तुम्ही? या आतंकवादाचा कसा सामना करणार? या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. मला प्रचंड संताप होतोय..मला हे सहन होत नाहीये. बांगलादेशात जे घडतंय ते कोणी घडवलं? ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पार्टीने? बीजेपीची सत्ता नसलेल्या भागात ते विरोधकांची वोटर बँक आणि ताकद बनत्यात. त्यांना खोटे आधार कार्ड बनवून देण्यात हे विपक्षीय लोक धन्यता मानत्यात. कारण, ते त्यांना वोट देत्यात. हा देशद्रोह आहे. वफ्फ बिल्लात सुधारणा आणली गेली म्हणून बांगलादेशात हे सगळं घडलं. कारण, हे पाकिस्तान, आणि इथल्या देशद्रोही संघटनांसाठी महत्त्वाची घटना होती. कारण, त्यांची ताकद आपण कमी करणार होतो. यांना तुम्ही अजूनही सपोर्ट करणार आहात का?

हे सगळं थांबवा...हा देश फक्त कुठल्याही नेत्याची नव्हे तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा देश त्या लोकांच्याच हाती सोपवणं गरजेचं आहे ज्यांना इथल्या हिंदूंची काही पडलेली आहे. मोदींना माझं आवाहन आहे, कळकळीची विनंती आहे की ज्यासाठी आम्ही तुम्हाला निवडूण दिलंय त्या या राक्षसांचा आधी नायनाट करा. विकास नंतर झाला तरी चालेल. आधी मला या देशातला हिंदू सुरक्षित हवाय. आधी यांना संपवा. आम्ही तुम्हाला मत यासाठी दिलंय..हे एकमेव कारण आहे. विकासाचं आम्ही नंतर बघू. हिंदूच संपून गेला तर विकास कोणासाठी? मी आता काही व्हिडिओज बघितले. हसती-खेळती कुटुंब बरबाद झाली आहेत. यांचा काय दोष आहे? हे लोक कुठे चुकले आहेत? हा देश सुरक्षित हातात असला पाहिजे. ही सुरक्षा तुम्हाला कोण देऊ शकतं याचं तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. मी त्या सेक्युल्यरिझम, नेते यांचा धिक्कार करते जे आतंकवाद्यांना पाठिशी घालतात. यांच्यामुळे माझ्या देशातील नागरिक सुरक्षित नाही. यांना धडा शिकवा. हे बघून तुम्हाला त्रास होत नसेल, तर तुमच्या शरीरात रक्त नाही पाणी आहे. माझ्या शरीरात हिंदूंच रक्त आहे म्हणून मला त्रास होतोय. 
 


टीआरएफने घेतली हल्ल्याची जबाबदारी

या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट'ने (टीआरएफ) स्वीकारली आहे. या संघटनेने म्हटले आहे की, परप्रांतीय लोक पर्यटक बनून येतात, मग मालकासारखे वागतात. अशा लोकांना धडा शिकविण्यात येईल, असा दर्पोक्ती या संघटनेने केली आहे. गेल्या वर्षीही हल्ला: काश्मीरमध्ये गेल्या वर्षी राजस्थानच्या एका दाम्पत्यावर गोळीबार झाला होता. १८ मे २०२४ रोजी रात्री दोन ठिकाणी हल्ले झाले. भाजपचे स्थानिक नेते एजाज अहमद शेख यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Web Title: jammu kashmir pahalgham terror attack megha dhade gets emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.