सोशल मीडियावर असतो तिचा बोलबाला,चार वर्षांनीच करते बर्थ डे सेलिब्रेशन !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:50 PM2020-02-29T14:50:43+5:302020-02-29T14:55:10+5:30

जान्हवी छेडाने 2007 मध्ये तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. आता ती फारशी अभिनय क्षेत्रात अॅक्टीव्ह नसली तरीही सोशल मीडियावर सक्रीय असते.

Janhavi Cheda Birthday Celebrate Her Birthday In Every 4 yrs In February-SRJ | सोशल मीडियावर असतो तिचा बोलबाला,चार वर्षांनीच करते बर्थ डे सेलिब्रेशन !

सोशल मीडियावर असतो तिचा बोलबाला,चार वर्षांनीच करते बर्थ डे सेलिब्रेशन !

googlenewsNext

'बालिका वधू' मालिकेत आनंदीची ननंद सुग्नाची भूमिका साकारणारी जान्हवी छेडा सध्या खूप खुश आहे. कारण आज तिचा वाढदिवस आहे. दरवर्षी ही तारिख येत नसल्यामुळे चार वर्षांनीच ती तिचा वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करते त्यामुळे हा दिवस तिच्यासाठी जरा खासच असतो. आज मोठ्या आनंद ती आपला वाढदिवस सेलिब्रेट करते. तसेच सोशल मीडियावर चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षावही सुरू आहे. जान्हवीने याबाबतचा आनंद सोशल मीडियावर शेअरही केला आहे. “वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावं यासारखा दुसरा आनंद जगात नाही. त्यांच्याशिवाय वाढदिवसाचं आनंद अपूर्ण आहे असे तिने म्हटले आहे. तसेच आपल्या लेडी लव्ह जान्हवीला पती निशांतने खास सरप्राईजही दिले आहेत. 

 


तसेच त्याने जान्हवीचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. “जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू सगळ्यात वेगळी आहेस जी माझ्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन येते. तुझ्या साऱ्या मनोकामना पूर्ण होवो अशा शब्दांत निशांतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सीआईडी मध्येही ती इंस्पेक्टर श्रेयाच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर 'आसमान', 'मायका', 'धूप में ठंडी छांव...मां', 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई', 'अदालत' आणि 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतही तिने भूमिका साकरल्या आहेत.

2011 मध्ये जान्हवीने बॉयफ्रेंड निशांत गोपालियासह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.त्यांना एक मुलगी आहे. मुळची गुजरातची असणारी जान्हवीचे बालपण हे मुंबईत गेले आहे. तिच्या करिअरची सुरूवात तिने गुजराती रंगभूमीपासूनच केली आहे. 2007 मध्ये तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती.

 

 

आता ती फारशी अभिनय क्षेत्रात अॅक्टीव्ह नसली तरीही सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या खास गोष्टी ती तिथे अपडेट करत असते. लग्नानंतर कुटुंबियांना वेळ देण्यात बिझी झाली आहे. सध्या मुलीचा सांभाळ करण्यात त्याचबरोबर मदरहून एन्जॉय करत आहे.

Web Title: Janhavi Cheda Birthday Celebrate Her Birthday In Every 4 yrs In February-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.