'लक्ष्मी निवास' मालिकेत लग्नसराई, महालात सजणार जान्हवी आणि जयंतच्या लग्नाचा मांडव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:39 IST2025-01-28T14:38:48+5:302025-01-28T14:39:51+5:30
जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी दळवी कुटुंब सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याचा सोहळात किर्लोस्कर चारचांद लावायला तयार आहेत.

'लक्ष्मी निवास' मालिकेत लग्नसराई, महालात सजणार जान्हवी आणि जयंतच्या लग्नाचा मांडव
मराठी टेलिव्हिजनचा येणारा आठवडा मनोरंजनची खास मेजवानी घेऊन येत आहे. कारण होणार आहे 'लक्ष्मी निवास' (Laxmi Niwas) आणि 'पारू' (Paru Serial) या दोन मालिकांचा महासंगम. दळवी आणि किर्लोस्कर कुटुंब भव्य मंगलकार्यासाठी एकत्र येत आहे. जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी दळवी कुटुंब सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याचा सोहळात किर्लोस्कर चारचांद लावायला तयार आहेत.
भव्य मंगलकार्य म्हटलं म्हणजे हे कार्य पार पडण्यासाठी स्थळही तितकच भव्य हवं. तेव्हा पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवर हे भव्य मंगलकार्य खऱ्या अर्थाने आलिशान महालात पार पडत आहे. पण त्याआधी अहिल्यादेवी आणि जयंतमध्ये स्थळासाठीची रस्सीखेच सुरु आहे, त्याच दरम्यान हे उलगडतं की अहिल्या आणि लक्ष्मी मैत्रिणी आहेत. हे ऐकून जयंतच म्हणतो की तुम्ही दोघी मैत्रिणी आहात तर आपण ह्या स्थळावर दोन्ही कार्यक्रम पार पाडू, पण एक अट आहे की जान्हवी आणि माझ्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमात म्हणजे अगदी लग्न लागेपर्यंत सहभागी व्हायचे.
बहिणीच्या लग्नात भावना आणि सिद्धू यांच्यात गैरसमज निर्माण होणार आहेत. सिद्धूला असं वाटतंय की आदित्यच भावनाचा नवरा आहे आणि भावना एका मुलीची आई आहे. यामुळे तो अस्वस्थ आहे. सिद्धूला अजून एक धक्का बसतो जेव्हा त्याला समजते की लक्ष्मी हीच सिंचनाची सासू आहे. हे ऐकून तो चक्रावून जातो. विश्वाही या लग्नासाठी आलाय. तिथे त्याची प्रीतमशी भेट होते. ते दोघं मिळून हे भव्य मंगलकार्य बिघडवायचं ठरवतात. मात्र, विश्वा जान्हवीच्या चेहऱ्यावर आनंद बघून विचार बदलतो. या प्रसंगी पारू आणि सिद्धूची मैत्री होते, जिथे सिद्धू आदित्यचं अपहरण करायचं ठरवतो.
जयंत जान्हवीचे लग्न आणि आदित्य-अनुष्काचा साखरपुडा
दिशा आणि अनुष्काला एकत्र बघून पारूसमोर त्यांचं सत्य बाहेर येईल? तसेच, रवीला समजते की तो ज्या व्यक्तीला खूप काळापासून व्यवसायासाठी कॉल करत होता, तो दुसरा कोणी नसून संपतरावच आहे. हे अपघाताचं सत्य जर कोणी बाहेर काढलं तर काय होईल, या काळजीत रवी आहे. या सगळ्यात जयंत जान्हवीचे लग्न आणि आदित्य- अनुष्काचा साखरपुडा कसा पार पडणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 'भव्य मंगलकार्य' महासंगम ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास'चा २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी दररोज ७.३० वाजल्यापासून झी मराठीवर पाहायला मिळेल.