आला रे आला गोविंदा आला! थर रचले, हंडी फोडली अन्...; मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:47 PM2024-08-27T15:47:32+5:302024-08-27T15:52:11+5:30

'मन धागा धागा जोडते' नवा फेम अभिनेता अभिषेक राहाळकर चाहत्यांसोबत दादरमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दहीहंडी फोडत अभिषेकने चाहत्यांबरोबर आनंद लुटला.  

janmashtami 2024 man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar celebrates dahihandi | आला रे आला गोविंदा आला! थर रचले, हंडी फोडली अन्...; मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

आला रे आला गोविंदा आला! थर रचले, हंडी फोडली अन्...; मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

देशभरात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक सेलिब्रिटीही मोठ्या आनंदाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा करतात. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठी अभिनेता अभिषेक रहाळकरने दहीहंडी फोडत चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

'मन धागा धागा जोडते' नवा फेम अभिनेता अभिषेक राहाळकर चाहत्यांसोबत दादरमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दहीहंडी फोडत अभिषेकने चाहत्यांबरोबर आनंद लुटला.   याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिषेक दहीहंडी फोडताना दिसत आहे. अभिषेकच्या चेहऱ्यावर दहीहंडी फोडतानाचा उत्साहही पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


अभिषेक मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय चेहरा आहे. त्याने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. 'स्वामिनी' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेली सदाशिवराव पेशवे ही भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. 'वैदेही' या मालिकेतही तो झळकला होता. सध्या तो 'मन धागा धागा जोडते नवा' मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: janmashtami 2024 man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar celebrates dahihandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.