यंदाच्या जन्माष्टमीला कृष्णा भारद्वाजने सांगितले त्याच्या नावामागील गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:29 PM2019-08-22T12:29:24+5:302019-08-22T12:31:23+5:30
छोट्या पडद्यावरील ऐतिहासिक काल्पनिक मालिका 'तेनाली रामा'मध्ये शीर्षक भूमिका साकारणा-या कृष्णा भारद्वाजने त्याचे नाव कृष्णा का आहे यामागील कथा सांगितली.
भगवान कृष्णाच्या जन्मानिमित्त सर्वत्रच जन्माष्टमी जल्लोषात साजरी केली जाते. प्रत्येकजण भगवान कृष्णाच्या खोडकर स्वभाव आणि बौद्धिक क्षमतेची प्रशंसा करतो. कृष्णा भारद्वाज या कलाकाराच्या जीवनावर भगवान कृष्णाचा मोठा प्रभाव पडलेला आहे. छोट्या पडद्यावरील ऐतिहासिक काल्पनिक मालिका 'तेनाली रामा'मध्ये शीर्षक भूमिका साकारणा-या कृष्णा भारद्वाजने त्याचे नाव कृष्णा का आहे यामागील कथा सांगितली.
फारच कमी लोकांना माहित आहे की, कृष्णा भारद्वाजचे मूळ नाव 'किर्तीकांत' होते. नाव बदलण्यामागील कथा विचारली असता कृष्णा म्हणाला, ''मी स्वत:ला कृष्णा नाव दिले. मला ४थी इयत्तेमध्ये माझी शाळा बदलावी लागली होती. शाळेसाठी माझी मुलाखत चाचणी देत असताना मी स्वत:चे नाव 'कृष्णा' सांगितले आणि पेपरवर तेच नाव लिहिले. त्यावेळी मला कृष्णा नावाची स्पेलिंग देखील माहित नव्हती. मला शिक्षकांनाच स्पेलिंग विचारावी लागली होती.''
याव्यतिरिक्त कृष्णाने भगवान कृष्णाच्या नावाशी असलेल्या संबंधाबाबत देखील सांगितले. कृष्णा भारद्वाज म्हणाला, ''पुराणमतवादी पुजारी कुटुंबातून असल्यामुळे मी विविध देवांबाबत कथा वाचल्या होत्या. यापैकी सर्वात रोमांचक कथा होती भगवान कृष्णाची. मी त्याच्या कथा, त्याचा खोडकरपणा आणि त्याच्या हुशारीने खूपच प्रभावित आणि प्रेरित झालो. शेवटी मी स्वत:ला हेच नाव देण्याचे ठरवले.'' अभिनेत्याने रामा सारखी भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबाबत देखील आभार व्यक्त केले. रामा हा भगवान कृष्णाप्रमाणेच मेहनती, हुशार व बुद्धिमानी असून खोडकर देखील आहे.