लग्नापर्यंत पोहचली होती गोष्ट, पण जन्नत आणि फैसल शेखचं ब्रेकअप? केलं इन्स्टाग्रामवर अनफॉलो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:18 IST2025-03-12T12:18:19+5:302025-03-12T12:18:35+5:30
अगदी कमी वयात मोठं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे जन्नत जुबैर

लग्नापर्यंत पोहचली होती गोष्ट, पण जन्नत आणि फैसल शेखचं ब्रेकअप? केलं इन्स्टाग्रामवर अनफॉलो!
Jannat Zubair: अगदी कमी वयात मोठं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे जन्नत जुबैर. अवघ्या २३ वर्षांच्या जन्नतने सोशल मीडियावर फॅनफॉलोइंगच्या बाबतीत शाहरुखलाही मागे टाकलेलं आहे. ही सोशल मीडिया सेन्सेशन सध्या तिच्या लव्ह लाईफमुळं चर्चेत आहे. जन्नत ही फैजल शेखला डेट करत असल्याची चर्चा होती. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचंही बोललं जातं होतं. पण, अशातच आता दोघांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.
जन्नतने फैजल शेखला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. ब्रेकअपच्या चर्चांमध्ये जन्नतने शेअर केलेली क्रिप्टिक पोस्ट सध्या तुफान चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. "जे आहे ते स्वीकारा, जे होते ते सोडून द्या आणि जे होईल त्यावर विश्वास ठेवा", असं तिनं कॅप्शमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे फैजू अजूनही जन्नतला इंस्टावर फॉलो करत आहेत.
जन्नत सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असून त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचं ती मनोरंजन करते. जन्नत जुबैरने तिच्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली. 'फुलवा', 'तू आशिकी' यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये तिने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलंय. अगदी लहान वयातच तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 'खतरों के खिलाड़ी -१२' मध्येही ती झळकली.
जन्नतने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिने राणी मुखर्जीसोबत 'हिचकी' चित्रपटात देखील स्क्रीन शेअर केली आहे. यासोबत 'लव्ह का द एंड' मध्ये जन्नतने श्रद्धा कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. जन्नतची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे. तर फैसल शेख सध्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या शोमध्ये दिसतोय.