सिद्धार्थचा मृत्यूच्या धक्क्याने बिघडली अभिनेत्रीची प्रकृती, रूग्णालयात करावं लागलं भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:38 PM2021-09-07T13:38:48+5:302021-09-07T13:43:08+5:30

सिद्धार्थच्या जाण्याचा असा धक्का घेतला की तिला रुग्णालयात भरती करावं लागलं...सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jasleen Matharu Got Hospitalised As She Witnessing Heartbreaking Scenario After Sidharth Shukla’s Death | सिद्धार्थचा मृत्यूच्या धक्क्याने बिघडली अभिनेत्रीची प्रकृती, रूग्णालयात करावं लागलं भरती

सिद्धार्थचा मृत्यूच्या धक्क्याने बिघडली अभिनेत्रीची प्रकृती, रूग्णालयात करावं लागलं भरती

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी अजूनही त्याच्या चाहत्यांना पचवणं कठीण जात आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनामुळे त्याचे चाहते व आप्तांना जबर धक्का बसला आहे. अनेकजण अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. ‘बिग बॉस 12’ची स्पर्धक जसलीन मथारू (Jasleen Matharu) यापैकीच एक. सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्तानं तिला इतका मोठा धक्का बसला की, तिला रूग्णालयात भरती करावं लागलं. सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जसलीननं रूग्णालयातून एक व्हिडीओ शेअर करत स्वत: ही माहिती दिली आहे.

या व्हिडीओ  ती म्हणते, ‘त्यादिवशी सिद्धार्थच्या घरून परतल्यानंत मी आजारी पडले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर मी त्याच्या घरी गेली होती. शहनाज आणि सिद्धार्थच्या आईला भेटले. त्या दोघींची अवस्था बघवत नव्हती. वातावरण बघून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते. घरी आल्यानंतर सुद्धा माझ्या डोळ्यासमोर तेच दृश्य होतं. घरी आल्यावर मी मोबाईल पाहिला. कोणीतरी मला मॅसेज पाठवला होता. तू पण मर, असं त्या मॅसेजमध्ये लिहिलं होतं. तो मॅसेज वाचून मी आणखीच बैचेन झाले. अचानक मला ताप भरला. मी स्वत:ला रूग्णालयात भरती केलं. गेल्या रात्री मला 104 डिग्री ताप होता. सध्या 103 डिग्री ताप आहे. पण तब्येत सुधारतेय. तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. ’

याआधी जसलीनने शहनाजला भेटल्यानंतरची तिची अवस्था सांगितली होती. शहनाजला स्वत:चं भानं नव्हतं. ती फक्त एकटक बघत होती. मी तिला हलवून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तिने मला तिच्या बाजूला बसायला सांगितलं. पण ती काहीही बोलली नाही. ती नुसती शून्यात बघत होती, असं जसलीनने सांगितलं होतं.

Web Title: Jasleen Matharu Got Hospitalised As She Witnessing Heartbreaking Scenario After Sidharth Shukla’s Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.