बुरखा अन् हिजाब घालून मशिदीत गेली जास्मीन भसीन, नेटकरी म्हणाले, "शेवटी बॉयफ्रेंड अलीनेही तुला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 08:37 AM2023-06-11T08:37:16+5:302023-06-11T08:39:08+5:30

जास्मीन भसीन आणि अली गोनी २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

jasmine bhasin tv actress visits shaikh jaid mosque in abudhabi wearing burqua trollers trolled her saying boyfriend ali goni did this to you | बुरखा अन् हिजाब घालून मशिदीत गेली जास्मीन भसीन, नेटकरी म्हणाले, "शेवटी बॉयफ्रेंड अलीनेही तुला..."

बुरखा अन् हिजाब घालून मशिदीत गेली जास्मीन भसीन, नेटकरी म्हणाले, "शेवटी बॉयफ्रेंड अलीनेही तुला..."

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmine Bhasin) मोठ्या काळापासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. ना ती कोणत्या डेली सोपमध्ये आहे ना एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये. एखाद्या म्युझिक अल्बममध्येच तिला शेवटचं पाहिलं गेलं. मात्र ती सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असते. तसंच बॉयफ्रेंड अली गोनीसोबतच्या (Ali Goni) अफेअरमुळेही ती चर्चेत असते. नुकतीच जास्मीन दुबईला फिरायला गेली असता तिने शेख जैद मशिदीला भेट दिली. तेथील व्हिडिओ रील्सही तिने पोस्ट केले. यावेळी तिने हिरव्या रंगाचा बुरखा परिधान केला आहे. 'अलीने तुलाही हिजाब घालायलाच लावला' अशा शब्दात तिच्यावर नेटकरी टीका करत आहेत.

जास्मीन भसीन आणि अली गोनी २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2021 मध्ये बिग बॉस 14 च्या घरात दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर घरातून बाहेर आल्यानंतरही ते रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. मात्र जास्मीनने पोस्ट केलेल्या एका रीलमुळे नेटकरी नाराज झालेत. तिने शेख जैद मशिदीत फिरतानाचा रील व्हिडिओ पोस्ट केला आहे जो सध्या व्हायरल होतोय. तिने हिरवा बुरखा आणि डोक्यावर ओढणी घेतलेली आहे. 'जन्नत का बगीचा' असं कॅप्शन तिने या रीलला दिलं आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी टीका केली तर काही जणांनी जास्मीनला पाठिंबाही दिलाय. 'शेवटी अलीनेही तुला  हिजाब घालायला लावला', 'अजून एक लव्ह जिहाद' अशा कमेंट्स या व्हिडिओखाली केलेल्या आहेत. तर काहींनी तिला पाठिंबा देताना म्हटले, 'तिच्यावर टीका करण्याआधी ऐका अबू धाबीच्या या मशिदीत अभया आणि हिजाब घालण्याचा नियमच आहे.  इथे कोणत्याही धर्माच्या लोकांना एंट्री आहे', 'तिने पूर्ण कपडे घातले आहेत हे कोणाला पचत नाहीए का ती सुंदर दिसतीए आणि अभयात काय वाईट आहे' असं म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.

Web Title: jasmine bhasin tv actress visits shaikh jaid mosque in abudhabi wearing burqua trollers trolled her saying boyfriend ali goni did this to you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.