जास्मिन भसीनला या कलाकाराची वाटायची भीती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 11:01 AM2017-03-23T11:01:17+5:302017-03-23T16:31:17+5:30

छोट्या पडद्यावरील दिल से दिल तक ही मालिका रसिकांच्या मनात घर करत आहे. अल्पवधीतच ही मालिका घरोघरी पोहचली आहे. ...

Jasmine Bhasinala fear of the artist? | जास्मिन भसीनला या कलाकाराची वाटायची भीती?

जास्मिन भसीनला या कलाकाराची वाटायची भीती?

googlenewsNext
ट्या पडद्यावरील दिल से दिल तक ही मालिका रसिकांच्या मनात घर करत आहे. अल्पवधीतच ही मालिका घरोघरी पोहचली आहे. या मालिकेतील कलाकारांवरही रसिक तितकेच प्रेम करत आहेत. विशेष म्हणजे मालिकेतील टेनी अर्थात जास्मिन भसीन आणि पार्थ भानुशाली म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला यांच्या अभिनयावर रसिक फिदा झालेत. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावते आहे. दोघांच्या अभिनयातील जिवंतपणा रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. मात्र त्यांच्या या केमिस्ट्रीमागेही एक खास असं कारण आहे. जेव्हा या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात झाली त्यावेळी जास्मिन सिद्धार्थ शुक्लाच्या दहशतीखाली होती. कोण जाणे काय कारण होतं, मात्र सिद्धार्थपुढे ती दचकून राहत असे. जास्मिनला सिद्धार्थची इतकी भीती वाटायची की शुटिंगच्या सुरुवातीच्या काळात त्याच्यापासून ती चार हात लांब राहायची. त्याच्याशी बोलणं, बाहेर जाणंसुद्धा जास्मिन टाळत असे. तिच्या मनात सिद्धार्थविषयी अशी काही दहशत निर्माण झाली होती की सीनच्या शुटिंगआधीसुद्धा ती पूरेपूर काळजी घेत असे. सिद्धार्थसोबत सीन शूट करण्याआधी ती तिच्या सीनची पूर्णपणे रिहर्सल करत असेल. तिच्या वाट्याला आलेले डायलॉग पुन्हा पुन्हा बोलून त्याचा सराव करत असे. सगळा सीन आधी ती जाणून घ्यायची, त्याचा अभ्यास करायची आणि मगच सिद्धार्थसह तो सीन शूट करण्यासाठी जास्मिन उभी राहत असे. त्यामुळे ते दडपण तिच्या चेह-यावरही सहज पाहायला मिळायचे. जास्मिनला सीन शूट करताना कुणास ठाऊक कसली लाज वाटत असे. तिच्या चेह-यावर वेगळीच चिंता पाहायला मिळत असे. मात्र हळूहळू तिला सिद्धार्थसोबत कामाची सवय झाली. त्याच्यासोबत ती मनमोकळ्या पद्धतीने बोलू लागली. तिच्या मनातली भीती हळूहळू निघून गेली आणि आज दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. सुरुवातीला दडपणाखाली वावरणारी जाम्सिन आज मात्र सिद्धार्थसोबत असलेल्या मैत्रीबाबत भरभरुन बोलते. सिद्धार्थ एक उत्तम अभिनेता असून त्याच्याबद्दल खूप आदर असल्याचे ती सांगते. पूर्वी सिद्धार्थशी बोलताना, वागताना दचकून राहत असे मात्र आता आपण खूप चांगले मित्र बनलो असून दोघं मिळून संपूर्ण सेट डोक्यावर घेतो असं जास्मिन सांगते. प्रत्येक दिवसागणिक आम्ही एकमेकांना खूप चांगल्यारितीने ओळखू लागलो आहोत आणि त्यामुळेच एकमेकांच्या आवडीनिवडी समजू लागल्या. त्यावेळी दोघांमध्ये ब-याच गोष्टी सारख्या असल्याचे आढळल्याचे जास्मिन आता भरभरुन बोलते. या सगळ्या गोष्टींमुळे सिद्धार्थसोबत काम करणं आणखी सोपं झाल्याचे जास्मिनला वाटते. त्याच्यासोबत काम करताना खूप धम्माल येत असल्याचेही तिने आवर्जून सांगितलं. सिद्धार्थ आपला मार्गदर्शक, सल्लागार आणि ज्याच्यासोबत सेटवर न थकता बराच वेळ घालवू शकतो असा व्यक्ती असल्याचे जास्मिनला वाटते.

Web Title: Jasmine Bhasinala fear of the artist?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.