Bigg Boss 15 मधून बाहेर पडताच Jay Bhanushali ने शेअर केला बेडरुम फोटो, त्यातही केली मोठी चुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:28 IST2021-11-29T14:26:24+5:302021-11-29T14:28:16+5:30
Bigg Boss 15 मध्ये घरात एंट्री करणारा जय भानुशाली हा पहिला स्पर्धक होता. खुद्द सलमान खाननेच त्याचे घरात स्वागत केले होते.

Bigg Boss 15 मधून बाहेर पडताच Jay Bhanushali ने शेअर केला बेडरुम फोटो, त्यातही केली मोठी चुक
'बिग बॉस १५' सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. स्पर्धकही आपल्या खेळीने रसिकांचे भरघोस मनोरंजनक करत आहेत. मात्र घरात असेही स्पर्धक आहेत. ज्यांची घरात फार काही चांगली कामगीरी नसल्यामुळे रसिकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे स्पर्धकांना घरातून बाहेर पडावे लागले. अशा स्पर्धकांमध्ये टीव्ही अभिनेता जय भानुशालीही होता. तसेच सलमान खानही जय भानुशालीवर भडकला होता. रसिकांप्रमाणे जय भानुशालीची घरातली खेळा पाहून सलमानही निराश होता. सलमानने चक्क ''तुला स्टँड घेता येत नाही'' म्हणत जय भानुशालीला चांगेलच सुनावले होते.
विशेष म्हणजे घरात एंट्री करणारा जय भानुशाली हा पहिला स्पर्धक होता. खुद्द सलमान खाननेच त्याचे घरात स्वागत केले होते. इतकंच नाही तर या शोचा सगळ्यांत महागडा स्पर्धकही जय भानुशाली होता. आठवड्यासाठी ११ लाख रु इतकं मानधन त्याला देण्यात आले होते.तसेच जय भानुशाली या शोमध्ये एंट्री करणार असल्याच्या कुठेच चर्चाही नव्हत्या. शेवटच्या क्षणी तो एंट्री कणार असल्याचे ठरले होते. त्यामुळे शोमध्ये जाण्यापूर्वी जयचा कोणताच प्रोमोसुद्धा समोर आला नव्हता.
घरात त्याचे कामगीरी पाहता फार काही तो कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे तो घरातून बाहेर पडला. शोमधून बाहेर येताच तो पुन्हा त्याच्या कुटुंबासह क्लॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतोय. मुलगी तारा आणि पत्नी माहीसोबत त्याने त्याचा एक खास फोटो शेअर केला. बेडरुमधला त्यांचा हा फोटो आहे. हा फोटो त्याने चाहत्यांसह शेअर केला होता. हा फोटो शेअर तर केला फोटो मात्र चुकीच्या व्यक्तीला टॅग केला. त्याने त्याचा हा फोटो खुद्द जय भन्सालीला टॅक केल्याचे चाहत्यांना दिसले. चाहत्यांनी त्याची ही चुक लक्षात आणून दिली. फोटोवरुन चाहत्यांचे लक्ष टॅगवरच गेले. त्यामुळे जो कोणी हा फोटो बघतोय तो केवळ टॅग केलेल्या व्यक्तीचीच जास्त चर्चा करतोय. चाहत्यांनी जय भानुशालीला त्याची चुक लक्षात आणून दिल्यानंतर आता त्याने तो टॅग डिलीट केल्याचे पाहायला मिळतंय. या फोटोवर सध्या चुकीच्या टॅग केल्याच्याच जास्त कमेंट्स पाहायला मिळतायत.