हा अभिनेता सेटवर सगळ्यात जास्त करायचा फ्लर्ट, जया प्रदा यांनी सांगितले हे सिक्रेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:45 IST2021-01-13T18:43:20+5:302021-01-13T18:45:06+5:30
चित्रपटाच्या सेटवर कोणता अभिनेता सगळ्यात जास्त फ्लर्ट करत असे कपिलने जया प्रदा यांना विचारले.

हा अभिनेता सेटवर सगळ्यात जास्त करायचा फ्लर्ट, जया प्रदा यांनी सांगितले हे सिक्रेट
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.आता या कार्यक्रमात जया प्रदा, राज बब्बर, गुरप्रीत गुग्गी, इहाना ढिल्लन हजेरी लावणार आहेत.
अभिनेत्री जया प्रदा आणि राज बब्बर त्यांच्या काळातील अनेक किस्से सांगणार आहेत. द कपिल शर्मा या कार्यक्रमाचा सूत्रधार कपिल शर्माने या कार्यक्रमात जया प्रदा यांना विचारले की, चित्रपटाच्या सेटवर कोणता अभिनेता सगळ्यात जास्त फ्लर्ट करत असे त्यावर जया प्रदा यांनी लगेचच उत्तर न देता त्यांनी राज बब्बर यांना विचारले की, सांगू का... त्यांनी होकार दिल्यावर जया प्रदा यांनी सांगितले की, धर्म जी...
जया प्रदा यांनी धर्मेंद्र यांचे नाव घेताच सगळे खळखळून हसले. धर्मेंद्र आणि जया यांनी 'एलान-ए-जंग', 'फरिश्ते', 'गंगा तेरे देश में', 'इंसाफ कौन करेगा' और 'पापी देवता' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
जया प्रदा आणि जितेंद्र यांची जोडी तर त्याकाळातील सगळ्यात प्रसिद्ध जोडींपैकी एक मानली जात असे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळे कृष्णा अभिषेकने द कपिल शर्मा शोमध्ये जितेंद्र यांच्या गेटअपमध्ये उपस्थिती लावली. कृष्णाचा हा अंदाज पाहून अर्चना पुरणसिंग देखील खळखळून हसली. कृष्णाने जितेंद्र यांच्यासारखा गेटअप करत जया प्रदा यांच्यासोबत ताल धरला.