जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सुकन्या मोने भावूक, म्हणाल्या, 'माझा एव्हरग्रीन हिरो...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:35 PM2023-07-24T14:35:14+5:302023-07-24T14:37:37+5:30

'वादळवाट' मालिकेत सुकन्या मोने यांनी जयंत सावरकरांबरोबर काम केलं आहे.

jayant sawarkar death sukanya mone emotional post saying my evergreen hero stay fit in heaven also | जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सुकन्या मोने भावूक, म्हणाल्या, 'माझा एव्हरग्रीन हिरो...'

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सुकन्या मोने भावूक, म्हणाल्या, 'माझा एव्हरग्रीन हिरो...'

googlenewsNext

ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजनसृष्टी हळहळली आहे. मालिका, सिनेमा आणि नाटकातून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते जयंत सावरकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर यांच्यासोबत अनेक कलाकारांनी काम केले आहे. त्यांच्या निधनाने कलाकारांना उणीव जाणवत आहे. अभिनेत्री सुकन्या मोने (Sukanya Mone) यांनीही पोस्ट शेअर करत जयंत सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सुकन्या मोने यांनी जयंत सावरकरांसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोखाली कॅप्शन देत त्या लिहितात, 'माझा एव्हरग्रीन हिरो..... तिथेही मस्त फिट राहाल ह्याची खात्री आहे..... सगळ्यांना आपलंसं कराल..... पण मी मात्र इथे खूप खूप मिस करेन तुम्हाला...अण्णा.'



'वादळवाट' मालिकेत सुकन्या मोने आणि जयंत सावरकर यांनी एकत्र काम केलं आहे. जयंत सावरकर यांनी अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आहे.  ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम आदींच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर वावरण्याची संधी मिळाली. मे २०२३ मध्ये अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

Web Title: jayant sawarkar death sukanya mone emotional post saying my evergreen hero stay fit in heaven also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.