जयडी उर्फ किरण ढाणे दिसणार या मालिकेत, दिसणार डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 13:49 IST2019-02-09T13:46:14+5:302019-02-09T13:49:56+5:30
जयडी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

जयडी उर्फ किरण ढाणे दिसणार या मालिकेत, दिसणार डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत
जयडी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून यापूर्वी नकारात्मक भूमिका साकारणारी किरण आता डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'एक होती राजकुमारी' मालिकेच्या लाँच झालेल्या प्रोमोमध्ये या राजकन्येचे बाबा आपली मुलगी कसे आयुष्य जगेल याचे कवितारूपी मनोगत स्पष्ट करताना दिसतात. मात्र त्याच्या अगदी विरूद्ध या राजकन्येचे खरे आयुष्य आहे. काही कारणास्तव अवघडलेले आयुष्य आणि त्याच्याशी दोन हात करत आपले आयुष्य जगणारी ही राजकन्या. नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या ह्रदयात आपले स्थान निर्माण करणारी जयडी म्हणजेच अभिनेत्री किरण ढाणे या राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे तर तिच्या बाबांची भूमिका किशोर कदम म्हणजेच कवि सौमित्र यांनी साकारली आहे. उत्कृष्ट अभिनेत्यांची ही अदाकारी लवकरच सोनी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याबाबत विचारले असता, 'यापूर्वी खलनायकी भूमिका केल्यानंतर तशाच भूमिकांसाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मला एका चौकटीत अडकायचे नव्हते. 'एक होती राजकन्या'च्या निमित्ताने, एका खंबीर मुलीची भूमिका मला साकारायला मिळते आहे. खाकी वर्दीत असणारी ही अवनी जयडीसारखीच प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा असल्याचे, तिने स्पष्ट केले आहे.