"आजोबांना वाटायचं नातवाने पोलिसात जावं...", 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:13 AM2024-05-29T11:13:19+5:302024-05-29T11:15:44+5:30

इन्स्टाग्रामवर सौरभने आजोबांचा पोलिसांच्या वर्दीतील आणि त्याचा मालिकेतील फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

jeev maza guntala fame actor saurabh choughule shared emotional post | "आजोबांना वाटायचं नातवाने पोलिसात जावं...", 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

"आजोबांना वाटायचं नातवाने पोलिसात जावं...", 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'जीव माझा गुंतला' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून अभिनेता सौरभ चौघुले घराघरात पोहोचला. या मालिकेत सौरभ मुख्य भूमिकेत होता. त्याने साकारलेलं मल्हार हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या मालिकेमुळे सौरभ घराघरात पोहोचला. सौरभ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील काही अपडेट्सही तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. 

सध्या सौरभ सन मराठी वाहिनीवरील 'सुंदरी' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे. धनंजय ही भूमिका साकारताना सौरभचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. या पात्राबाबत सौरभने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सौरभचे आजोबा पोलीस होते. इन्स्टाग्रामवर सौरभने आजोबांचा पोलिसांच्या वर्दीतील आणि त्याचा मालिकेतील फोटो शेअर केला आहे. 

सौरभ चौघुलेची पोस्ट

हे पात्र थोडं जवळचं आणि कदाचित परिचयाचं... 

कारण आजोबा पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांचा रुबाब, त्यांचा थाट हा खूप जवळून पाहिला होता.

त्यांना युनिफॉर्ममध्ये कधी पाहिलं नाही. पण, नक्कीच त्यात ते असेच दिसत असतील हे त्यांच्या फोटोवरून नेहमी वाटायचं. त्यांना कायम वाटायचं की आपल्या नातवाने पोलीसात जावं, कदाचित तो योग असा जुळून आला असावा.....

थोडं धनंजयबद्दल.....

एक असं पात्र ज्यात वेगळ्या छटा होत्या, एक मजा होती. त्याचा एक रुबाब होता, एक प्रियकर होता, एक बाप होता, एक जावई होता आणि त्याहून महत्वाचं एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होता. ह्या पात्रास मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमासाठी त्यांचे खूप खूप आभार. 

सौरभच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. सौरभने आता 'सुंदरी' या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आता त्याला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: jeev maza guntala fame actor saurabh choughule shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.