Taarak Mehta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारकनंतर बबिताजी सोडणार मालिका? जाणून घ्या सत्य....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 11:14 IST2022-05-23T10:35:01+5:302022-05-23T11:14:58+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah )हा टीव्हीवरचा कॉमेडी शो दीर्घकाळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तुम्हीही या मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे.

Taarak Mehta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारकनंतर बबिताजी सोडणार मालिका? जाणून घ्या सत्य....
तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah )हा टीव्हीवरचा कॉमेडी शो दीर्घकाळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. अगदी भारतातच नाही तर जगभर या शोचे चाहते आहेत. तुम्हीही या मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, दिशा वकानी, नेहा मेहता, गुरूचरण सिंह, शैलेश लोढा यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री ही मालिका सो़डणार असल्याचं कळतंय. ती म्हणजे बबिताजी होय, मुनमुन दत्तची लोकप्रियता बघता तिला बीग बॉस OTTच्या सेकंड सीझनची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे ही ऑफर जर मुनमुन दत्तने स्वीकारली तर ती तारका मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला रामराम करू शकते.
तारका मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र नव्या रिपोर्टनुसार शैलेश लोढानंतर आता मुनमुन दत्तही ही मालिका सोडू शकते. बबिता जी आणि जेठालाल यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडते. मालिकेच्या सुरुवातीपासूनच मुनमुन या मालिकेचा भाग आहे.
अशी मिळाली होती भूमिका
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बबीताच्या भूमिकेतून अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात लोकप्रिय झाली. मुनमुन दत्ताचे नाव दिलीप जोशीने निर्मात्यांना सुचविले होते. त्यानंतर निर्मात्यांनी मुनमुनची बबीताच्या भूमिकेसाठी निवड केली. लोकांना बबीता आणि जेठालालमधील रोमांस खूप भावतो. बबीताच्या भूमिकेमुळे मुनमुन दत्ताच्या फॅन फॉलोव्हिंग खूप वाढले आहे.मुनमुन तारक मेहता शिवाय चित्रपटातही झळकली आहे. 'मुंबई एक्सप्रेस' नामक चित्रपटात मुनमुव हासनच्या भूमिकेत दिसली होती.
यामुळे होती चर्चेत
काही काळापूर्वी मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही खूप चर्चेला उधाण आलं होतं. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये राज ‘टप्पू’ची भूमिका साकारत आहे. या दोघांच्या अफेअरच्या बातम्यांवरून मुनमुनला खूप ट्रोल करण्यात आलं होतं आणि अभिनेत्रीला ही गोष्ट आवडली नाही .मुनमुनने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ट्रोल करणाºयांना चांगलंच सुनावलं होतं आणि राजसोबतच्या तिच्या अफेअरची बातमी खोटी असल्याचे सांगितलं होतं.