Jhalak Dikhhla Jaa: 31 किलोचा घागरा आणि डोक्यावर आग; झलकमध्ये रुबिनाने केला खिळ्यांवर डान्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:00 PM2022-11-04T18:00:26+5:302022-11-04T18:01:06+5:30

Jhalak Dikhhla Jaa 10: 'झलक दिखला 10'मध्ये रुबिना दिलैकने चक्क खिळ्यांवर डान्स केला आहे. डान्सची एक खास 'झलक' पाहाच...

Jhalak Dikhhla Jaa: 31 kg ghagra dress and fire on the head; In Jhalak, Rubina danced on nails | Jhalak Dikhhla Jaa: 31 किलोचा घागरा आणि डोक्यावर आग; झलकमध्ये रुबिनाने केला खिळ्यांवर डान्स...

Jhalak Dikhhla Jaa: 31 किलोचा घागरा आणि डोक्यावर आग; झलकमध्ये रुबिनाने केला खिळ्यांवर डान्स...

googlenewsNext

Jhalak Dikhhla Jaa 10: 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी'नंतर रुबिना दिलैक आता 'झलक दिखला 10' गाजवत आहे. रुबिना ही 'झलक दिखला जा' मधील एक दमदार स्पर्धक आहे. दर आठवड्याला रुबिना तिच्या डान्सने जज आणि चाहत्यांना चकित करत असते. या वीकेंडलाही रुबिना स्टेजला 'आग' लावण्यासाठी सज्ज झाली आहे.

रुबिनाचा दमदार डान्स
'झलक दिखला 10' च्या आगामी एपिसोडमध्ये रुबिना दिलैकचा एक थरारक डान्स पाहता येणार आहे. या डान्स परफॉरमन्समध्ये रुबिना घागरा-चोलीमध्ये डान्स करेल. या डान्सची एक झलक पोस्ट करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये रुबिना डोक्यावर आग लावलेला माठ धरताना दिसत आहे. 

खिळ्यांवर केला डान्स 


तुम्हाला वाटेल की, घागरा-चोली घालून अन् डोक्यावर माठ ठेवून कोणीही डान्स रेल. पण, या डान्ससाठी रुबिनाने तब्बल 31 किलोचा घागरा घातला आहे. याशिवाय ती स्टेजवर ठेवलेल्या 500 खिळ्यांवर अनवाणी नाचणार आहे. सोशल मीडियावर रुबिनाच्या डान्सची झलक व्हायरल झाल्यानंतर, चाहतेही चकीत झाले आहेत.

रुबिना ही 'एक्सप्रेशन क्वीन' आहे
माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही यांनी रुबीनाला एक्स्प्रेशन क्वीन ही पदवी दिली आहे. शोचे तिन्ही जज रुबिनाच्या डान्सवर खुश असतात. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत रुबिना प्रत्येक डान्स संपूर्ण ताकत लावून करत असते. रुबिना ज्या प्रकारचा डान्स करत आहे, ते पाहता ती सीझनची विजेतीही होऊ शकते, असे वाटते. 

Web Title: Jhalak Dikhhla Jaa: 31 kg ghagra dress and fire on the head; In Jhalak, Rubina danced on nails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.