'झनक' आणि माझ्यात बरंच साधर्म्य आहे..., हिबा नवाबनं सांगितलं मालिकेतील भूमिकेबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 05:53 PM2023-11-18T17:53:21+5:302023-11-18T17:53:43+5:30
Hiba Nawab : अभिनेत्री हिबा नवाब 'झनक' मालिकेत झनकची मुख्य भूमिका साकारणार आहे. कृशल आहुजा उर्फ अनिरुद्ध हा मुख्य नायकाच्या भूमिकेत असेल तर चांदनी शर्मा अर्शीची भूमिका साकारणार आहे.
स्टार प्लस वाहिनीवर नव्याने दाखल होणारी झनक ही एक नवी मालिका आहे, जी डोळ्यांत आशा आणि स्वप्ने बाळगणाऱ्या एका युवतीची कहाणी आहे, परंतु तिच्या आयुष्यात अनपेक्षित प्रसंग येतात. अभिनेत्री हिबा नवाब 'झनक' मालिकेत झनकची मुख्य भूमिका साकारणार आहे. कृशल आहुजा उर्फ अनिरुद्ध हा मुख्य नायकाच्या भूमिकेत असेल तर चांदनी शर्मा अर्शीची भूमिका साकारणार आहे.
झनक’ मालिकेत अशा एका युवतीची कहाणी कथन केली आहे, जी गरिबीत मोठी होते आणि नृत्यांगना बनण्याची आकांक्षा बाळगते. तिच्या आकांक्षा साध्य करण्यासाठी झनक सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा निश्चय करते खरी, पण जेव्हा तिच्या कुटुंबावर एक शोकांतिका ओढावते तेव्हा तिच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. या मालिकेतील झनकच्या आयुष्यात होणार्या भावनिक उलथापालथीचे साक्षीदार प्रेक्षकांना होता येईल. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ती शून्यातून विश्व कसे निर्माण करते, याची कथा या मालिकेत उलगडली जाणार आहे. झनक, अनिरुद्ध आणि अर्शी यांच्या नातेसंबंधांचा हृदयस्पर्शी प्रवास आणि दुरावलेल्या नात्यांचा त्यांनी केलेला सामना हे पाहणे रंजक असेल.
हिबा नवाब म्हणाली, "मी ‘झनक’ मालिकेचा भाग होण्यास अतिशय उत्सुक आहे आणि या मालिकेत मी प्रमुख भूमिका साकारणार आहे. माझ्यासाठी हे सारे थरारक आहे. ‘झनक’ काश्मीरची आहे, तिला नृत्यांगना बनायचे आहे आणि तिचे कुटुंबावर अतिशय प्रेम आहे. स्वत:चे नशीब बदलणे आणि मनाची इच्छा पूर्ण करणे हे झनकचे ध्येय आहे. मी झनकच्या व्यक्तिरेखेशी- विशेषत: तिचे तिच्या आईसोबत असलेल्या नात्याशी साधर्म्य साधू शकते. मालिकेत दिसणारी मी आणि प्रत्यक्षातील मी सारखीच आहे. झनकची व्यक्तिरेखा साकारताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळतील आणि मी त्याची वाट पाहात आहे.” लीना गंगोपाध्याय निर्मित ‘झनक’ मालिका २० नोव्हेंबरपासून सोमवार ते रविवार रात्री १०.३० वाजता ‘स्टार प्लस’वर प्रसारित होईल.