'जिजाजी छतपर हैं'मध्ये इलायची करणार चांदनी चौकाचे रुपांतर सिमल्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 20:27 IST2019-01-18T20:27:32+5:302019-01-18T20:27:56+5:30
इलायची आपल्या बालपणीची एक इच्छा स्वप्नात पाहते. ते म्हणजे आपल्या आवडत्या शिफॉन साडीमध्ये सिमल्याच्या हिरव्यागार वातावरणात नृत्य करणे.

'जिजाजी छतपर हैं'मध्ये इलायची करणार चांदनी चौकाचे रुपांतर सिमल्यात?
सोनी सबच्या 'जिजाजी छतपर हैं' या मालिकेला प्रेक्षकांना बदललेले कथानक आणि खास व्यक्तिरेखा जसे इलायची, पंचम आणि मुरारी यांच्यासह टीव्हीच्या पडद्यावर खिळवून ठेवणे शक्य झाले आहे. या मालिकेच्या आगामी भागात इलायची आपल्या बालपणीची एक इच्छा स्वप्नात पाहते. ते म्हणजे आपल्या आवडत्या शिफॉन साडीमध्ये सिमल्याच्या हिरव्यागार वातावरणात नृत्य करणे. खूप प्रयत्न केल्यावरही पंचमला इलायचीला सिमल्याला घेऊन जाण्यासाठी सुट्टी मिळणे शक्य होत नाही.
त्याचवेळी करूणाचा पाय मुरगळतो. त्यामुळे मुरारी आणि करूणाही सिमल्याची सहल रद्द करतात.
इलायची ही सहल एकटीनेच पूर्ण करायचे ठरवते आणि चांदणी चौकाचे रूपांतर सिमल्यात करायचे निश्चित करते. इलायची आपल्या योजनेत यशस्वी होऊन पंचमसोबत बर्फात खेळ खेळेल का? हिबा नवाब या शोमध्ये इलायचीच्या भूमिकेत असून ती म्हणाली की, मला जिजाजी छतपर हैं कुटुंबाचा भाग असल्याने खूप आनंद होत आहे, कारण या शोमध्ये इलायचीची भूमिका करून मला भरपूर संधी मिळाली आहे. रोजच्या जाणाऱ्या दिवसासोबत मी कलाकार म्हणून मोठी होऊ लागले आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना इलायची चांदनी चौकाचे रूपांतर सिमल्यात करतानाच्या प्रयत्नात पाहताना खूप मजा येईल.
जिजाजी छतपर हैं मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सब वाहिनीवर पाहता येईल.