मन जिंकलस नेहा कक्कर..!, ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद सापडलेत आर्थिक संकटात, गायिकेने दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 15:11 IST2021-02-18T15:11:00+5:302021-02-18T15:11:27+5:30
इंडियन आयडॉलच्या मंचावर नुकतेच प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनी हजेरी लावली होती.

मन जिंकलस नेहा कक्कर..!, ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद सापडलेत आर्थिक संकटात, गायिकेने दिला मदतीचा हात
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलने अनेक गायकांना या देशातील मोठे गायक बनवले आहेत. या नवीन सत्रामध्ये देखील प्रेक्षकांचे संगीताबद्दलचे प्रेम अधिक वाढावे यासाठी इंडियन आयडॉलने पूर्ण तयारी केली आहे. या सत्रातील स्पर्धक तर अत्यंत प्रतिभावान आहेत. या वीकएंडला लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील प्यारेलाल जी मंचावर उपस्थित असणार आहेत.
इंडियन आयडॉल टीमने याच कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांना देखील आमंत्रित केले आहे. संतोष आनंद यांनी प्यारेलालजींसोबत काम केलेले आहे. त्यांनी सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याचे सांगितले. त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाबद्दल ऐकून नेहाला खूप वाईट वाटले आणि तिने संतोष जींना ५ लाख रु देण्याचे ठरवले. तिच्या मते संतोष जी हे संगीत उद्योगातील एक महत्त्वाचे नाव आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याची तयारी तिने दर्शवली. त्यांची कहाणी ऐकून ती इमोशनल झाली.
नेहाने भारतीय मनोरंजन उद्योगाला देखील संतोषजींना काम देण्यासाठी आवाहन केले. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना ५ लाख रु. देत आहोत असे ती म्हणाली. इतकेच नाही, तर विशाल दादलानी यांनीही संतोषजींना त्यांची काही देण्याची विनंती केली जी रिलीज करण्याची जबाबदारी विशाल दादलानीने दर्शवली.
नेहाने “एक प्यार का नग्मा” गीत म्हटले आणि संतोषजींनी देखील तिच्या सोबत काही ओळी म्हटल्या. प्यारेलाल जींना इंडियन आयडॉल २०२०च्या सेट्सवर या वीकएंडला रात्री ८ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पहायला मिळणार आहे.