विनोदवीर होण्यास जॉनी लीव्हरने प्रेरणा दिली- राजीव निगम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 04:32 AM2018-03-02T04:32:31+5:302018-03-02T10:02:31+5:30
‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही राजकीय परिस्थितीवर विडंबनात्मक भाष्य करणारी पहिलीच विनोदी मालिका आहे. त्यात ...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही राजकीय परिस्थितीवर विडंबनात्मक भाष्य करणारी पहिलीच विनोदी मालिका आहे. त्यात चैतूलाल या भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याचे चित्रण केले आहे. सामान्य माणसाला भेडसावणार््या अडचणी आणि संकटांकडे दुर्लक्ष केले जात असून त्याला कधीच पूर्ण न केली जाणारी पोकळ आश्वासने देणार््या भ्रष्ट नेत्यांवर तिरकस झोत टाकण्यात आला आहे. राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमातील एक लोकप्रिय उमेदवार राजीव निगम हे या मालिकेत चैतूलालची भूमिका रंगविणार आहेत. प्रत्येक विनोदवीराचा एक आदर्श विनोदी अभिनेता असतो, असे त्यांचे मत आहे. राजीव निगम म्हणाले, “आपण विनोदाचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यापुढे जॉनी लीव्हर येतो. तो गेली 40 वर्षं हिंदी चित्रपटांमध्ये असून त्याने आपल्या विनोदाने प्रेक्षकांना नुसतं हसविलेलंच नाही, तर जमिनीवर गडाबडा लोळायला लावलं आहे. विनोदवीर होण्यास मला जॉनी लीव्हरनेच प्रेरणा दिली. आजघडीचा तो सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता असून तो ज्या भूमिका करतो, त्यात तो आपलं सर्वस्व ओततो.” राजीव निगम यांच्या मते ही मालिका म्हणजे राजकीय विडंबन या त्यांच्या खास पसंतीच्या क्षेत्राचा आविष्कार करण्याचे माध्यम असून ही मालिका प्रेक्षकांच्या मनात अर्थपूर्ण परिणाम साध्य करील.
‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही आगामी मालिका देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य सादर करणार आहे.राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’या कार्यक्रमातील एक लोकप्रिय उमेदवार राजीव निगम हे या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची भूमिका रंगविणार आहेत.