चित्रपटात कधी झळकणार जुई गडकरी ? अभिनेत्रीने अखेर केला खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 11:04 IST2024-11-25T11:03:19+5:302024-11-25T11:04:04+5:30
जुई सिनेमात कधी दिसणार, याबद्दल आता खुद्द तिनेच सांगितलं आहे.

चित्रपटात कधी झळकणार जुई गडकरी ? अभिनेत्रीने अखेर केला खुलासा, म्हणाली...
अभिनेत्री जुई गडकरी (Jui gadkari) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या बद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. सोज्वळ, सालस असलेली जुई आज मालिका विश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. पण, जुई सिनेमात कधी दिसणार, याबद्दल आता खुद्द तिनेच सांगितलं आहे.
मालिकाविश्व गाजवणाऱ्या जुईला चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. नुकतंच जुईने सोशल मीडियावर 'आस्क मी सेशन' घेतलं. यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तर एका चाहत्याने तिला "ताई तुला चित्रपटासाठी विचारणा होते का? आणि होत असेल तर स्वीकारत का नाही?", असा प्रश्न केला. य यावर जुईने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत असं म्हटलं की, "विचारणा होते! पण मला हवं तसं काम नाही मिळत! म्हणुन 'चांगल्या' कामाची वाट बघत आहे'.
सध्या जुई 'ठरलं तर मग' मालिकेमुळे चर्चेत असते. यात ती सायलीची भूमिका साकारत आहे. तसंच टीआरपीमध्ये ही मालिका अनेकदा पहिल्या क्रमांकावर असते. नुकतंच जुईच्या कानाची शस्त्रक्रिया झाली. तिच्या डाव्या कानाचा पडदाच फाटला होता. यातून बरी होत आता ती पुन्हा सेटवर परतली आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने जुई गडकरी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' तसेच 'वर्तूळ' अशा मालिकांमध्ये जुई मुख्य भूमिकेत झळकली आहे.