आश्रमातील निराधारांना जुई गडकरीचा मदतीचा हात, होतोय कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:32 IST2024-10-28T13:31:36+5:302024-10-28T13:32:15+5:30
जुई गडकरीचा स्तुत्य उपक्रम; अनाथ, वृद्धांची दिवाळी केली गोड

आश्रमातील निराधारांना जुई गडकरीचा मदतीचा हात, होतोय कौतुकाचा वर्षाव
मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी. ही गुणी अभिनेत्री घराघरांतल्या स्त्रियांची लाडकी ऑनस्क्रीन सूनबाई म्हणून मिरवते. जुई गडकरी सोशल मीडियावर सक्रीय असते आहे. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आताही तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जुईवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
जुई गडकरी गेल्या काही वर्षांपासून शांतीवन आश्रमातील निराधार आजीआजोबा आणि कुष्ठरोगाने त्रस्त असणारे काही पेशंट यांच्यासोबत दिवाळी साजरे करते. यंदाही जुईने आश्रमातील लोकांची दिवाळी गोड केली आहे. नुकतेच जुईने शांतिवनला भेट दिली. जुईने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शांतिवन आश्रमाची पूर्ण झलक पाहायला मिळत आहे. जुईच्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे या स्तुत्य उपक्रमानिमित्त कौतुक केले आहे.
आजही समाजातील अनेक घटक असे आहेत. ज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. त्यांच्या आयुष्यातही सुखाचा प्रकाश यावा, म्हणून जुईचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. सध्या जुई 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिच्या या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. यामध्ये तिची आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेमुळे जुईच्या फॅन फॉलोईंगमध्येही वाढ झाली आहे. जुईने आजवर पुढचं पाऊल, वर्तुळ अशा मराठी मालिकांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय जुई बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होती.