'आता मला खूप भीती वाटते'; जुई गडकरीने केला मुंबई लोकलने कर्जत, ठाण्याहून प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:04 PM2023-08-14T12:04:22+5:302023-08-14T12:05:21+5:30
Jui gadkari: 'पुढचं पाऊल' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई गडकरी मुळची कर्जतची आहे.
मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल ट्रेनकडे पाहिलं जातं. दररोज लाखो प्रवासी मुंबई उपनगरातून लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. मुंबईत राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी लोकल प्रवास काही नवीन नाही. त्यामुळे सामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनीदेखील गर्दीमध्ये धक्के खाल्ले आहेत. अलिकडेच लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिने मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला.
'पुढचं पाऊल' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई गडकरी (jui gadkari) मुळची कर्जतची आहे. त्यामुळे अभिनेत्री होण्यापूर्वी जुईने बऱ्याचदा लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं.यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. यामध्येच एकाने तिला लोकल ट्रेनच्या अनुभवाविषयी प्रश्न विचारला.
"मॅम, तुम्ही कधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून गर्दीच्या वेळी कर्जत किंवा ठाणे येथून प्रवास केला आहे का?", असा प्रश्न या चाहत्याने जुईला विचारला. त्यावर,''हो! मला ट्रेनमधून प्रवास करणे खूप सोपे जायचे. मी फक्त उभी राहायचे आणि इतर बायका मला ढकलून मस्त ट्रेनमध्ये चढवायच्या…तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. पण, आता मला ट्रेनची भीती वाटते. मुंबईत गर्दीच्या वेळेत जे लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात त्यांना खरंच सलाम आहे,'' असं उत्तर जुईने दिलं.
दरम्यान, जुई सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते. यात अलिकडेच तिने कर्जतच्या बाजारातील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली होती. जुईने पुढचं पाऊल या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने तुजवीण सख्या रे, बिग बॉस मराठी, ठरलं तर मग अशा गाजलेल्या मालिका, शोमध्ये काम केलं