केवळ ९ वर्षांच्या 'जेटशेन' ने जिंकली सारेगमपची ट्रॉफी, चिमुकलीच्या गायकीने जिंकले चाहत्यांचे मन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 09:38 AM2023-01-23T09:38:25+5:302023-01-23T09:39:39+5:30
सारेगमप हा अनेक वर्षांपासून प्रसिद्धा सिंगिंग शो आहे. गेल्या ३ महिन्यांपासून सुरु असलेला शो चा ९ व्या सिझनचा समारोप झाला आहे.
SAREGAMAPA Little Champs 9 : सारेगमप लिटिल चॅम्प्स ९ चे विजेतेपद घोषित झाले असून केवळ ९ वर्षांच्या जेटशेन डोहना लामाने (Jetshen Lama) सारेगमपची ट्रॉफी जिंकली आहे. सारेगमप लिटिल चॅम्प सिझन ९ साठी अनु मलिक (Anu Malik), शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि नीती मोहन (Neeti Mohan) हे जज होते तर भारती सिंगने (Bharati Singh) शोचे सूत्रसंचालन केले. तीन महिन्यांनंतर फिनाले पार पडला.
जेटशेन बनली विनर
सारेगमप हा अनेक वर्षांपासून प्रसिद्धा सिंगिंग शो आहे. गेल्या ३ महिन्यांपासून सुरु असलेला शो चा ९ व्या सिझनचा समारोप झाला आहे. तर केवळ ९ वर्षांच्या जेटशेनने ट्रॉफी जिंकली तर हर्ष सिकंदर आणि ज्ञानेश्वरी घाडगे हे फर्स्ट आणि सेकंड रनर अप ठरले.
जेटशेन सिक्कीम ची आहे. तिने वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच गाणं शिकायला सुरुवात केली. तिला शो मध्ये मिनी सुनीधी चोहान म्हणले जायचे. सारेगमापा विजेतेपद घोषित झाल्यानंतर जेटशेन ला ट्रॉफीसह १० लाख रुपये देखील मिळाले.
शो जिंकल्यानंतर जेटशेन म्हणाली, 'माझं स्वप्न पूर्ण झालं. ही स्पर्धा अवघड होती कारण सगळेच खूप टॅलेंटेड होते. या प्रवासात खूप शिकायला मिळाले. मी सर्वांची आभारी आहे. मी अनेक आठवणी इथून घेऊन जात आहे.'
सारेगमप लिटिल चॅम्प्सचा फिनाले धमाकेदार झाला. अनेक अप्रतिम परफॉर्मन्स, हृदयाला भिडतील अशी गाणी सादर केली गेली. सुरुवातीला टॉप ६ मध्ये हर्ष सिकंदर, रफा यासमीन, अथर्व बक्षी, अतनु मिश्रा, जेटशेन लामा आणि ज्ञानेश्वरी घाडगे यांचा समावेश होता. यांचे जबरदस्त परफॉर्मन्स झाले. ज्यामुळे सर्वच मंत्रमुग्ध झाले. फक्त स्पर्धक नाही तर जजेस ने देखील मस्त परफॉर्म केले.
या फिनाले साठी दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी (Amit Trivedi) यांनी देखील फिनालेला हजेरी लावली. त्यांनी प्रेक्षकांना चांगलेच हसवले. जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी मंजीरा वाजवत उत्साह वाढवला. जेटशेन च्या गाण्याने अमित त्रिवेदी इतके प्रभावित झाले की त्यांनी तिला 'परेशान' गाणे म्हणण्याची विनंती केली.