"फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या...", शिव ठाकरेने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:20 IST2024-07-22T13:19:01+5:302024-07-22T13:20:05+5:30
Shiv Thakare : शिव ठाकरे नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

"फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या...", शिव ठाकरेने व्यक्त केली खंत
आपला हक्काचा माणूस म्हणून अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) ओळखला जातो. बिग बॉस मराठी २ (Bigg Boss Marathi 2)चा विजेता ठरलेला शिव आज मराठीसह हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात तो पोहोचला आहे. शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या हळव्या स्वभावामुळेही ओळखला जातो. शिव ठाकरे नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
शिव ठाकरे याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ल्यांवर भाष्य केले आहे. खरेतर त्याने प्लॅनेट मराठीच्या 'आयुष्याची जय' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अनेक त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या शोचा प्रोमो समोर आला आहे.
प्रोमोमध्ये शिव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम, व्यक्त करताना दिसत आहे. त्याचे गडांप्रती असलेले प्रेमही यातून दिसत आहे. त्यामुळे या शोमधून शिव किती महाराजभक्त आहे, याचे दर्शन घडतेय. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात. त्यामुळे महाराजांचे फक्त नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा, अशी विनंतीही शिवने यावेळी केली आहे. याव्यतिरिक्त शिवच्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्याने इथे उलगडल्या आहेत.
शिव ठाकरेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 'बिग बॉस सीझन १६', 'खतरों के खिलाडी सीझन १३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.