कैलाश खेरने पहिल्यांदाच गायले मराठी मालिकेचे शीर्षकगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 12:16 IST2021-06-19T12:12:38+5:302021-06-19T12:16:43+5:30
या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे.

कैलाश खेरने पहिल्यांदाच गायले मराठी मालिकेचे शीर्षकगीत
ठळक मुद्देप्रख्यात गायक कैलाश खेरच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे.
कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच नवनाथांच्या आयुष्यावर मालिका बनवली जाणार आहे. 'गाथा नवनाथांची' आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.
या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रख्यात गायक कैलाश खेरच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे. नवनाथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षगीतामुळेसुद्धा लोकांपर्यंत पोचणार आहे. कैलास खेरला बॉलिवूडमधील आघाडीच्या गायकांपैकी एक मानले जाते.
हिंदी, मल्याळम, ऊर्दू, तेलगु यासारख्या प्रादेशिक भाषांमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कैलाश खेर याने गाणी गायली आहेत. ‘तेरी दिवानी’ हे त्याचे गाणे तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.