'तारक मेहता का उल्टा चष्मा’'मुळे मिळत नाहीय काम; 'या' अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 04:40 PM2022-11-11T16:40:11+5:302022-11-11T16:56:38+5:30
अभिनेत्री काजल पिसल हिने दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन दिले आहे आणि ही दयाबेनच्या भूमिकेत लवकरच दिसणार आहे अशी जोरदार चर्चा देखील होती. मात्र आता एका मुलाखतीदरम्यान काजलने मोठा खुलासा केला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा ' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा अत्यंत लोकप्रिय शो आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक दयाबेनची आतुरतेने वाट पाहत असल्याचं पाहायला मिळत आहेत. दयाबेन मालिकेत पुन्हा कधी दिसणार? अशा प्रश्न हजारो प्रेक्षकांना पडला आहे. चाहते नव्या 'दयाबेन'ची वाट पाहात आहेत. 'दयाबेन' हे पात्र अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) हिने घराघरांत पोहोचवलं. पण दिशानं मालिकेतून एग्झिट घेऊन आता चार वर्ष झाली आहेत. तरीही चाहते आजही दयाबेनचा अनोखा गरबा आणि आवाजाची आठवण काढत आहेत. काही दिवसांपूर्वी 'दयाबेन'साठी (dayaben) नव्या अभिनेत्रीचं नाव निश्चित करण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
अभिनेत्री काजल पिसल हिने दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन दिले आहे आणि ती दयाबेनच्या भूमिकेत लवकरच दिसणार आहे अशी जोरदार चर्चा देखील होती. मात्र आता एका मुलाखतीदरम्यान काजलने मोठा खुलासा केला आहे. "मी दयाबेनच्या रोलसाठी काही दिवसांपूर्वी ऑडिशन दिले होते. ऑडिशन दिल्यानंतर बरेच दिवस निर्मात्यांच्या कॉलची वाट पाहा होते. परंतू मला त्यांचा कॉल आलेला नाही. मात्र मी दयाबेनची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या खूप वेगाने पसरल्या. यामुळे आता मला काम मिळत नाही" असं काजलने म्हटलं आहे.
"लोकांना वाटते की, ही दयाबेनची भूमिका करणार असून सर्व काही फायनल झाले आहे. मात्र, मी सांगू इच्छिते की मी दयाबेनची भूमिका करणार नाही. माझी यासाठी निवड झाली नाही आणि मला काम हवे आहे. दयाबेनची मी भूमिका करणार असल्याचे कळाल्याने मला कोणीही काम देत नाही. जर माझ्यासाठी काही रोल असेल तर मला फोन करा" असं काजल पिसलने म्हटलं आहे. काजलने 'कुछ इस तरह', 'एक हजारों में मेरी बहना है', 'उड़ान' आणि 'नागिन 5' या शोमध्ये काम केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"