अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी या अभिनेत्यावर काजोलला होता क्रश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 17:32 IST2019-04-29T17:29:05+5:302019-04-29T17:32:35+5:30
काजोलचे अभिनेता अजय देवगण सोबत लग्न झाले असून बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी ते दोघे आहेत. पण अजय देवगणच्या आधी काजोलला एका अभिनेत्यावर क्रश होता.

अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी या अभिनेत्यावर काजोलला होता क्रश
बॉलिवूडची सेनोरिटा काजोल देवगन आणि बॉलिवूडचा ‘द ग्रेट’ दिग्दर्शक करण जोहर यांच्यातली भांडणं तुम्हाला ठाऊक आहेतच. ते दोघे कित्येक वर्षांपासून एकमेकांशी बोलत नाहीत. मध्यंतरी काजोलने आमच्यातील सर्व भांडणे संपलीत आम्ही पुन्हा एकत्र आलो असे ट्विट देखील केले होते. मात्र, अलीकडेच सोनी वाहिनीवरील कॉमेडी शो कपिल शर्मा शोमध्ये हे दोघे बिछडे यार, दोस्त काजोल-करण एकमेकांना भेटले. या दोघांनी कपिल शर्मासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. तसेच एकमेकांचे अनेक सिक्रेट्स देखील त्यांनी या कार्यक्रमात सगळ्यांना सांगितले.
काजोलचे अभिनेता अजय देवगण सोबत लग्न झाले असून बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी ते दोघे आहेत. पण अजय देवगणच्या आधी काजोलला एका अभिनेत्यावर क्रश होता हा खुलासा करणने या कार्यक्रमात केला आहे. याविषयी करणने सांगितले, हिना या चित्रपटाच्या प्रिमियर पार्टीला अक्षय आला होता. त्यावेळी मी आणि काजोल देखील तिथेच होतो. काजोल पूर्णवेळ केवळ अक्षयलाच पाहात होती. त्यावेळी माझी आणि काजोलची मैत्री नव्हती. पण आम्ही दोघांनी मिळून या इव्हेंटमध्ये अक्षयला शोधले होते आणि त्या दिवसांनंतर आमची चांगली गट्टी जमली.
अक्षय आणि काजोलने नंतरच्या काळात ये दिल्लगी या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्यांच्या दोघांसोबतच सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील अक्षय आणि काजोलची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
करणने द कपिल शर्मा शो मध्ये त्याच्या विषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमाच्या दरम्यान करणने सांगितले की, त्याचे खरे नाव हे करण नसून राहुल आहे. त्याने सांगितले की, माझ्या पत्रिकेत माझे नाव राहुल कुमार असे आहे. पण पासपोर्टवर माझे नाव करण हेच आहे. माझ्या नावाची गंमतच आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण माझे खरे नाव राहुल ठेवण्यात आले होते. पण माझ्या जन्माच्या काही दिवसानंतर माझ्या पालकांना माझे नाव बदलावे असे वाटले आणि त्यांनी माझे नाव करण असे ठेवले. पत्रिकेनुसार माझे नाव बदलण्यात आले होते.