​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 04:13 AM2018-04-24T04:13:48+5:302018-04-24T09:43:48+5:30

उन्हाळ्यातली पिवळी धम्म सूर्यकिरणं आणि त्याने होणारी अंगाची लाहीलाही झाली की आठवण होते ती मनाला गारवा देणाऱ्या हिरव्याकंच पाठीच्या, ...

'Kalingaad Party' by artists from Zee Youth's Kattabati series | ​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'

​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'

googlenewsNext
्हाळ्यातली पिवळी धम्म सूर्यकिरणं आणि त्याने होणारी अंगाची लाहीलाही झाली की आठवण होते ती मनाला गारवा देणाऱ्या हिरव्याकंच पाठीच्या, लालबुंद पोटाच्या, पाणीदार कलिंगडाची. रस्त्यांवर असणारे कलिंगडाचे ढिगारे पहिले तरी डोळ्यांना थंडावा मिळतो. त्याच कलिंगडाची एक-एक लालबुंद फोड समोर आली की, त्यावर तर यथेच्छ ताव मारला जातो तर या गर्मीच्या वातावरणात  अहमदनगर मध्ये शूट होत असलेल्या झी युवाच्या कट्टी बट्टी मालिकेतील कलाकारांचे असंच काहीतरी घडलं. नुकताच अश्विनी कासार या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर कट्टी बट्टी मालिकेच्या कलाकारांबरोबर केलेल्या 'कलिंगड पार्टी चे फोटो अपलोड केले आहेत. सध्या या मालिकेत अश्विनी पूर्वा हे मुख्य पात्र साकारत आहे. एकीकडे छोट्या शहरातील मुलगी असेलली पूर्वा द्विधा मनस्थितीमध्ये अडकली आहे. तिच्या लग्नाची लगबग सुरू आहे आणि दुसरीकडे तिची पीएचडी पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. कट्टीबट्टी मालिकेचे शूट करताना अश्विनीने सगळ्या युनिटला कलिंगडची पार्टी दिली आणि थंडगार फळ खाताना सेटवरचे वातावरण अतिशय आनंदायी बनले. या फोटोबद्दल अश्विनी कासारला विचारले असता ती सांगते, "नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. थंडीच्या थंडगार मोसमातून अलगतपणे ऋतू छटा बदलताना आपल्याला दिसतोय. बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे असते. आरोग्याची काळजी आपण घेतली नाही तर या दिवसांमध्ये त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसून येतात. उन्हाच्या दिवसांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर फळांचे सेवन करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात खूप महत्वाचे फळ म्हणजे कलिंगड. या फळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्व असल्याने आणि विपुल प्रमाणात पाणी असल्याने त्याचा फायदा आपल्याला शरीराला होतो. कलिंगडामधून विटॅमिन ए, बी६ आणि विटामिन सी खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्याच प्रमाणे अँटिऑक्सिडेंट्स आणि अमिनो अॅसिड सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळते. कलिंगडामुळे आपल्या शरीरामधील रक्त चांगल्या प्रकारे वाहू लागण्यास मदत होते, जर तुम्हाला डोळ्यांच्या तक्रारी असतील तर तुम्ही कलिंगडाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल, कलिंगडामुळे तुमचा मूडही ठीक होण्यास मदत होईल, तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर कलिंगडाचे सेवन तुमच्यासाठी वरदान ठरू शकते, कलिंगडामुळे तुमची किडनी सुरक्षित राहण्यासाठी मदत होते, कलिंगड हे एक अँटिऑक्सिडेंटसुद्धा आहे. उन्हापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी हे फळ खूप मदत करतं, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या स्नायूंना कलिंगडामुळे बराच फायदा होतो. या अनेक फायद्यांमुळे मी नेहमीच कलिंगड खाते आणि आज माझ्या सेटवरील सर्व कुटुंबासाठी ही कलिंगड पार्टी देण्याचे मी ठरवले. "

Also Read : कट्टी बट्टी या मालिकेद्वारे पुष्कर सरदने केली छोट्या पडद्यावर एंट्री
 

Web Title: 'Kalingaad Party' by artists from Zee Youth's Kattabati series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.