'उई अम्मा' गाण्यावर थिरकली कल्याणची चुलबुली गर्ल, शिवाली परबच्या डान्सला मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:43 IST2025-01-31T10:42:37+5:302025-01-31T10:43:24+5:30
Shivali Parab : 'उई अम्मा' या गाण्याची कल्याणची चुलबुली गर्ल म्हणजेच शिवाली परबलाही भुरळ पडली आहे. ती या गाण्यावर थिरकली आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

'उई अम्मा' गाण्यावर थिरकली कल्याणची चुलबुली गर्ल, शिवाली परबच्या डान्सला मिळतेय पसंती
नुकताच 'आझाद' (Azad Movie) चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण (Aman Devgan) आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी(Rasha Thadani)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील 'उई अम्मा' गाणं खूपच लोकप्रिय ठरलं. या गाण्यावर राशाने खूपच दमदार डान्स केलाय. तिचे खूप कौतुक झालं. या गाण्यावर सोशल मीडियावर खूप रिल पाहायला मिळत आहेत. दरम्यान या गाण्याची कल्याणची चुलबुली गर्ल म्हणजेच शिवाली परब(Shivali Parab)लाही भुरळ पडली आहे. ती या गाण्यावर थिरकली आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
शिवाली परबने राशा थडानीवर चित्रीत झालेल्या 'उई अम्मा' गाण्यावर डान्स केला आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी शिवाली नो मेकअप लूकमध्ये दिसते आहे. यावेळी तिने व्हाइट शर्ट आणि ब्लॅक लाँग स्कर्ट परिधान केला आहे. या गाण्यावर तिने छान डान्स मुव्ह्ज केल्या आहेत. तिने केलेल्या डान्सला पसंती मिळताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'उई अम्मा'. मला डान्स शिकवल्याबद्दल चेतना भटची खूप आभारी आहे. आय लव्ह यू.
शिवाली परबच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने काही सिनेमांमध्ये काम केले आहे. 'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. अलिकडेच तिचा मंगला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात ती मुख्य भूमिकेत होती. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्येही शिवाली वेगवेगळे पात्र साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचे अवली लवली कोहली हे कॅरेक्टरही खूप लोकप्रिय झाले.