कामना पाठक 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची करते कॉपी, शेअर केला सेम टु सेम लुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 12:00 PM2019-02-17T12:00:00+5:302019-02-17T12:00:00+5:30
आपल्या आवडत्या कलाकाराप्रमाणेच स्टाइलप्रमाणे राहण्याचाही प्रयत्न करतात. अशीच एक टीव्ही अभिनेत्री आहे कामना पाठक जी सोनाक्षी सिन्हाची मोठी चाहती आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे देशातच नाही तर जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील या कलाकारांच्या बाहेर फॅन्सची मोठी गर्दी कायमच पाहायला मिळते. आपल्या आवडत्या कलाकाराप्रमाणेच स्टाइलप्रमाणे राहण्याचाही प्रयत्न करतात. अशीच एक टीव्ही अभिनेत्री आहे कामना पाठक जी सोनाक्षी सिन्हाची मोठी चाहती आहे.
'हप्पू की उलटन पलटन' या आगामी विनोदी मालिकेत एक नाही दोन नाही तर ९ वस्ताद मुलांच्या आईची भूमिका कामना साकारणार आहे. कामनाने रंगमंचापासून तिच्या अॅक्टींग करिअरला सुरूवात केली आहे. त्यामुळे नाट्यक्षेत्रात ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा असणाऱ्या कामनाने प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत अनेक नाटकं केली आहेत आणि आता ती छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी खूप उत्सुक आहे. सध्या कामना 'हप्पू की उलटन पलटन' या विनोदी मालिकेचा भाग बनणार म्हटल्यावर खूप मेहनतही घेत आहे.
एक रंजक बाबा म्हणजे ती दिसण्यात सोनाक्षी सिन्हा सारखीच दिसत असल्यामुळे तिला सेटवर सोनाक्षी सिन्हा म्हणूनच बोलवले जाते. तसेच योगायोग म्हणजे तिचा लूक हा तिची आवडती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाप्रमाणेच करण्यात आला आहे. सोनाक्षीच्या पहिल्या सिनेमात म्हणजेच दबंगमध्ये तिचा जो लुक होता तसाच काहीसा लुक कामनाचा 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये आहे.
निर्मात्यांना बुंदेलखंडी उच्चारण असणारी अभिनेत्री हवी होती आणि कामना त्यासाठी अगदी योग्य होती. त्यामुळे, ही भूमिका मिळणे, हे आपलं नशीबच आहे, असं कामनाला वाटते. कामनाने सांगितले की, "मी मध्यप्रदेशची आहे. मी आणि आई एकमेकींशी बुंदेलखंडी लहेज्यातच बोलतो त्यामुळे ही शैली माझ्यात अगदी स्वाभाविकपणे आहे. अर्थात, तिच्याशी बोलणं फार सोपं आहे पण हप्पूसाठी संवाद बोलताना ते काहीसं कठीण जातं. कारण, त्यात मला एक प्रकारचा ड्रामेटीक अंदाजात बोलावे लागते. पण, इथेही आईचीच मदत झाली. उच्चारण सुधारून अगदी हवे तसे संवाद म्हणता येतील, यासाठी तिने मदत केली. मला वाटतं टीव्हीवर बुंदेलखंडी भाषेचा फारसा वापर झालेला नाही. त्यामुळेही हे काम फार एक्साटींग आहे." या मालिकेत 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपूरी, योगेशही भन्नाट कलाकारांच्या भूमिका आहेत.