SEE PICS: अशी रंगली काम्या पंजाबीची बॅचलर पार्टी, गर्ल गँगसोबत केली धम्माल मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 15:22 IST2020-02-02T15:20:57+5:302020-02-02T15:22:48+5:30
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

SEE PICS: अशी रंगली काम्या पंजाबीची बॅचलर पार्टी, गर्ल गँगसोबत केली धम्माल मस्ती
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत काम्या लग्नगाठ बांधणार आहे. येत्या 10 फेब्रुवारी 2020 रोजी काम्या व शलभचा लग्नसोहळा होत आहे. काम्या सतत लग्नाबद्दलचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने बॅचलर पार्टी साजरी केली. या पार्टीचे काही फोटोही काम्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत काम्या तिच्या गर्लगँगसोबत मस्ती करताना दिसतेय.
बॅचलर पार्टीत काम्या पंजाबीने धाकड एन्ट्री घेतली. तिचा इन्डो वेस्टर्न अवतार तर पाहण्यासारखा होता. काही दिवसांपूर्वी काम्याने तिच्या शलभच्या लग्नाच्या पत्रिकेची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.
कामाच्या लग्नाच्या विधी 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. 9 ला हळद, महेंदी आणि संगीत आहे. तर 10 फेब्रुवारीला लग्न त्यानंतर 11 फेब्रुवारीला काम्या मित्र मंडळी आणि जवळच्या नातेवाईकासांठी एका ग्रँड पार्टीचे आयोजनही करणार आहे.
कुटुंबाच्या सहमतीनेच लग्नाचा निर्णय घेतला असून आता आम्ही जास्त दिवस एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे लग्न करत आयुष्याची सुंदर सुरूवात करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले होते.
शलभ डांग दिल्लीत राहणारा असून तो हेल्थकेअर बिझनेसमन आहे. काम्या पंजाबीचे हे दुसरे लग्न आहे. काम्याने पहिल्या पतीला लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली घटस्फोट दिला होता.