आज लग्न! पाहा काम्या पंजाबीच्या हळद व मेहंदी सेरेमनीचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 01:06 PM2020-02-10T13:06:30+5:302020-02-10T13:07:02+5:30
हळद लागली, मेंदी सजली...
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे फोटो एक एक करून समोर येत आहेत. आज काम्या लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी तिच्या अंगावर हळद लागली. हातांवर मेहंदी सजली. त्याचे फोटो समोर आले आहेत.
गतवर्षी 10 फेब्रुवारी या तारखेलाच काम्या व शलभ डांग यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले. वर्षभरानंतर याच तारखेला काम्या व शलभ लग्नाच्या आणाभाका घेत आहेत.
हळदीच्या कार्यक्रमात काम्या पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी तिला हळद लावली.
मेहंदी सेरेमनीत काम्याने ब्लू कलरचा लहंगा घातला होता. तिच्या दोन्ही हातांवर मेहंदी सजलेली दिसली.
काम्या सतत लग्नाबद्दलचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने बॅचलर पार्टी साजरी केली. या पार्टीचे काही फोटोही काम्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत काम्या तिच्या गर्लगँगसोबत मस्ती करताना दिसली होती.
शलभ डांग दिल्लीत राहणारा असून तो हेल्थकेअर बिझनेसमन आहे. काम्या पंजाबीचे हे दुसरे लग्न आहे. 2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. तिला 9 वर्षाची एक मुलगी आहे. शलभचेही हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे.