​काम्या पंजाबीने करण पटेलसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 11:00 AM2017-03-31T11:00:51+5:302017-03-31T16:30:51+5:30

काम्या पंजाबी आणि ये है मोहोब्बते फेम करण पटेल अनेक महिने नात्यात होते. त्यांना अनेक कार्यक्रमात एकत्र पाहाण्यात येत ...

Kamya Punjabi reveals about Karan's relationship with Patel | ​काम्या पंजाबीने करण पटेलसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

​काम्या पंजाबीने करण पटेलसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

googlenewsNext
म्या पंजाबी आणि ये है मोहोब्बते फेम करण पटेल अनेक महिने नात्यात होते. त्यांना अनेक कार्यक्रमात एकत्र पाहाण्यात येत असे. काम्या ही घटस्फोटीत असून तिला एक मुलगीदेखील आहे. करण आणि काम्याच्या प्रेमप्रकरणाची चर्चा बॉक्स क्रिकेट लीगच्यावेळी तर खूपच झाली होती. त्यावेळी ते सतत एकत्र दिसायचे. त्यामुळे ते दोघे लग्न करणार असल्याचेदेखील म्हटले जात होते. पण अचानक करणने अंकिता भार्गवशी लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. करणच्या या लग्नामुळे काम्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता असे तिने नुकतेच कबूल केले आहे.
करणचे लग्न झाल्यानंतर मी कित्येक दिवस डिप्रेशनमध्ये होती असे नुकतेच काम्या पंजाबीने एका मुलाखतीत म्हटले आहे. काम्याने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, "मी आणि करण एकमेकांना डेट करत होतो. पण त्याने अचानक लग्न केल्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेली होती. मी त्या दिवसांना कधीच विसरू शकत नाही. माझे संपूर्ण आयुष्य म्हणजे तो होता. पण तसे असतानादेखील तो मला अचानक सोडून गेला. त्याचे माझ्यासोबत अफेअर सुरू असताना त्याचे आणखी एक अफेअर सुरू होते आणि मला त्याची कल्पनादेखील नव्हती. या सगळ्या गोष्टीमुळे मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला." 
करणने काहीच महिन्यांपूर्वी ये है मोहोब्बते या मालिकेतील त्याचे सहकलाकार असलेले अभय भार्गव यांची मुलगी अंकिता भार्गवसोबत लग्न केले. काम्या आणि करणच्या नात्याला करणच्या कुटुंबीयांकडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे करणेने त्याच्या आई वडिलांच्या इच्छेनुसार अंकिताशी लग्न केले असे म्हटले जाते.  

Web Title: Kamya Punjabi reveals about Karan's relationship with Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.