Kangana Ranaut : कंगनाच्या Lock Upp मधील पहिली 'कैदी' ठरली! पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री Nisha Rawal चा प्रोमो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 06:31 PM2022-02-21T18:31:49+5:302022-02-21T18:38:48+5:30
आपल्या पतीवर विवाहबाह्या संबंध आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केल्याने ती आधीही आली होती चर्चेत
Kangana Ranaut Nisha Rawal, Lock Upp : अभिनेत्री कंगना राणौत हिची कारकिर्द बरीच वादग्रस्त आहे. फॅशन चित्रपटापासून तिने बॉलिवडमध्ये आपली छाप पाडायला सुरूवात केली. पण कालांतराने बॉलिवूडमधील घराणेशाहीला शह देण्यासाठी तिने सोशल मीडियाचा आधार घेतला. ट्वीटरवर कंगनाने केवळ सिनेसृष्टीच नव्हे तर राजकारणातील काही बड्या व्यक्तींवरही आरोप केले. त्यांच्यावरील टीकेमुळे कंगनाला अपेक्षित प्रसिद्धी मिळाली. ती बरेच दिवस चर्चेतही होती. पण आता मात्र कंगना एका खास कारणासाठी चर्चेत आहे. आणि ते कारण म्हणजे 'लॉक अप'.
प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिचा आगामी रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ हा २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. कंगना या शो मध्ये सूत्रसंचालन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, या शो मध्ये कोणकोणते कलाकार असतील याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नाही. असं असतानाच या रिअॅलिटी शो मधील काही गोष्टी उघड करण्याची सुरूवात निर्मात्यांकडून करण्यात आली आहे. लॉक अप या रिअॅलिटी शो ची पहिली स्पर्धक कोण असेल याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अभिनेत्री निशा रावल ही ‘लॉक अप’ रिअॅलिटी शो मध्ये दिसणार आहे. एक प्रोमोच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
निशा रावलने स्वत: याबद्दलचा प्रोमो शेअर केला आहे. यात सुरुवातीला निशाचा चेहरा दिसत नाही. पण नंतर मात्र ती व्यक्ती अभिनेत्री निशा रावलच असल्याचं स्पष्ट होतं. 'बहुत हुआ डेली सोप का हंगामा, अब शुरू होगी मेरी लाईफ में असली हंगामा', असं कॅप्शन पोस्ट करत तिने हा प्रोमो शेअर केला आहे.
कोण आहे निशा रावल?
'सास-बहु' प्रकारच्या डेली सोप मध्ये निशा ही एक संस्कारी सून होती. केसर, मै लक्ष्मी तेरे आंगन की, मी-बदलेगी दुनिया की रीत अशा डेली सोप मध्ये तिने सोज्वळ भूमिका साकारल्या आहेत. पण आता मात्र ती आपल्या बिनधास्त अंदाजात लॉक अप या रिअॅलिटी शो मध्ये दिसणार आहे. थोडाशा कठीण वाटणाऱ्या शो मध्ये टिकून राहण्यासाठी ती काय काय करते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. निशाचा एक्स पती करण मेहरा याच्या सोबत तिचे काही वाद झाले होते. निशाने करणवर घरगुती हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले होते. त्यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती.