कंगना रणौतने पुन्हा हृतिक रोशनवर साधला निशाणा, म्हणाली - ६ बोटं असणारा....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:43 AM2022-02-28T11:43:22+5:302022-02-28T11:45:09+5:30

Kangana Ranaut : आता पुन्हा एकदा आपला शो 'लॉक अप' मधून कंगनाने हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. तिने हृतिक रोशनचं थेट नाव न घेता, त्याच्यावर निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut indirectly takes a dig at Hrithik Roshan in her show Lock Up | कंगना रणौतने पुन्हा हृतिक रोशनवर साधला निशाणा, म्हणाली - ६ बोटं असणारा....

कंगना रणौतने पुन्हा हृतिक रोशनवर साधला निशाणा, म्हणाली - ६ बोटं असणारा....

googlenewsNext

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि कंगना राणौतचा (Kangana Ranaut) चा वाद तर सर्वांनाच माहीत आहे. ती नेहमीच हृतिक रोशनवर टिका करत होती. आता पुन्हा एकदा आपला शो 'लॉक अप' मधून कंगनाने हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. तिने हृतिक रोशनचं थेट नाव न घेता, त्याच्यावर निशाणा साधला आहे. ती जे काही बोलली त्यावरून हे स्पष्ट दिसतं की, तिचा इशारा हृतिककडे आहे.

कंगना (Kangana Ranaut) चा शो 'लॉक अप' २७ फेब्रुवारी सुरू झाला. डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, प्रीमिअर दरम्यान कंगना म्हणाली की, तिच्या शोमध्ये अनेक लोक एक्स्पोज होणार असल्याने घाबरत आहेत. यासोबतच ती म्हणाली की, लोकांनी ५ वर्ष तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता बोलू लागले आहेत. यानंतर ती असं काही बोलली ज्याकडे सर्वांचं लक्ष गेलं.

कंगना (Kangana Ranaut) म्हणाली की, लोक आपली पाचही बोटं जोडून...हात जोडत आहेत आणि ६ बोटं असलेल्याचा घसा कोरडा पडत आहे. कंगनाने शो च्या प्रीमिअरमध्ये ६ बोटं असलेल्या व्यक्तीचा उल्लेख केला. आता हे तर सर्वांनाच माहीत आहे की हृतिक रोशनला ६ बोटं आहेत. यादरम्यान कंगनाने त्याचं नाव न घेता म्हणाली की, शोमुळे हृतिक रोशनही घाबरलेला आहे की, तो एक्स्पोज तर होणार नाही ना? याआधीही कंगनाने हृतिक रोशनवर अनेकदा निशाणा साधला आहे.

कंगनाचा शो 'लॉक अप' बाबत सांगायचं तर आतापर्यंत १२ स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. ज्यात बबीता फोगाट, पूनम पांडे, निशा रावल, मुनव्वर फारूक, करणवीर बोहरा आणि इतर काही वादग्रस्त स्पर्धकांचा समावेश आहे. हे स्पर्धक शोमध्ये १० आठवडे कंगनाचे कैदी बनतील. ते सर्व मूलभूत गरजांसाठी एकमेकांशी लढताना दिसणार आहेत.
 

Web Title: Kangana Ranaut indirectly takes a dig at Hrithik Roshan in her show Lock Up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.