Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:00 PM2024-10-07T16:00:52+5:302024-10-07T16:10:54+5:30
Bigg Boss Marathi Season 5 winner Suraj Chavan And Kapil Honrao : सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर कपिलने केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
गुलीगत फेम सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर सूरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेते, अभिनेते खास पोस्ट करून त्याचं अभिनंदन करत आहेत. याच दरम्यान अभिनेता कपिल होनराव याने देखील आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट केली आहे. सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर कपिलने केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मल्हार ही भूमिका साकारून कपिल होनराव घराघरात पोहचला आहे. अभिनेत्याने आता "BiggBoss ची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव...." असं म्हणत सूरजचं अभिनंदन केलं. त्याला झापुक झुपूक शुभेच्छा दिल्या. पोस्टबरोबर कपिलने एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. ज्यामध्ये तो वेगवेगळ्या ऑडिशन्स देताना दिसत आहे. या व्हिडीओवर रिजेक्शन, रिजेक्शन, रिजेक्शन? असं लिहिलं आहे.
"१० वर्ष प्रायोगिक थिएटर, ३.५ वर्ष टॉपची सीरियल करून, स्वतः ला अभिनेता म्हणून सिद्ध करून.... सिक्स पॅक abs, अभिनयावर काम करून... इतके रोज ऑडिशन देतोय... एक लीडची ऑडिशन क्रॅक नाही होत... पण हा झापुक झुपूक बोलून.. #BiggBoss ची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव.... 😂😂 अभिनंदन सूरज... झापुक झुपूक शुभेच्छा... गोलीगत शुभेच्छा भावा खूप पुढे जा" असं कपिल होनराव याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन
गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने बॉस मराठीची ट्रॉफी पटकावली. "तुझा हाच स्वभाव महाराष्ट्राला भावला" असं म्हणत प्राजक्ता माळीने सूरजचं झापुक झुपूक अभिनंदन केलं आहे. "खूप खूप अभिनंदन सूरज! तुझ्यातला प्रामाणिकपणा आणि जिद्द बिग बॉसच्या घरात तुला भेटल्यावर अगदी स्पष्टपणे जाणवली होती... कदाचित तुझा हाच स्वभाव महाराष्ट्राला भावला... महाराष्ट्राच्या मनात तू स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलास आणि बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलस! पुन्हा एकदा खूप खूप, तुझ्या भाषेत झापुक झुपूक अभिनंदन" असं प्राजक्ताने म्हटलं आहे.