भारतीला ट्रोल करणाऱ्या यूजरवर भडकला कपिल शर्मा, म्हणाला - 'आधी आपल्या साइजचं शर्ट शिवून घे जाड्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 10:26 AM2020-11-26T10:26:21+5:302020-11-26T10:26:33+5:30

आता कपिल शर्माने भारतीला ट्रोल करणाऱ्या एका यूजरला फटकारलं आहे. भारतीचा बचाव करत कपिलने ट्रोलरला उत्तर दिलं आहे.

Kapil Sharma did the body shaming of the user trolling Bharti Singh | भारतीला ट्रोल करणाऱ्या यूजरवर भडकला कपिल शर्मा, म्हणाला - 'आधी आपल्या साइजचं शर्ट शिवून घे जाड्या'

भारतीला ट्रोल करणाऱ्या यूजरवर भडकला कपिल शर्मा, म्हणाला - 'आधी आपल्या साइजचं शर्ट शिवून घे जाड्या'

googlenewsNext

एनसीबीच्या रेडमध्ये भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाच्या घरातून व प्रॉडक्शन हाऊसमधून गांजा सापडला होता. ज्यानंतर दोघेही टोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. सोशल मीडियावरून लोक भारतीला ट्रोल करत आहेत. तर कॉमेडिअन राजू श्रीवास्तव यानेही भारतीची 'लल्ली झाली टल्ली' अशी खिल्ली उडवली होती. अशात आता कपिल शर्माने भारतीला ट्रोल करणाऱ्या एका यूजरला फटकारलं आहे. भारतीचा बचाव करत कपिलने ट्रोलरला उत्तर दिलं आहे.

भानू प्रताप सिंह राष्ट्रवादी नावाच्या एका तरूणाने ट्विरवर मंगळवारी एक ट्विट केलं होतं. ज्यात लिहिलं होतं की, भारती काय झालं, जोपर्यंत पकडली गेली नव्हती तोपर्यंत ड्रग्स घेत नव्हती. तिच तुझी परिस्थिती आहे कदाचित. जोपर्यंत पकडले जाऊ नये. (राजू श्रीवास्तवने ड्रग्सवरून उडवली भारती सिंहची खिल्ली, म्हणाला - लल्ली निघाली टल्ली....)

आपल्या मजेदार बोलण्याने लोकांचं मनोरंजन करणाऱ्या कपिल शर्माने याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी यावर उत्तर दिलं. यादरम्यान कपिल शर्मा त्याची बॉडी शेमींग केली. कपिल शर्माने उत्तरात लिहिलं की, 'आधी आपल्या साइजचा शर्ट शिवून घे, जाड्या'. आता काही लोक कपिल शर्माच्या या उत्तरावरून मजा घेत आहेत तर काही लोक बॉडी शेमिंग केल्याने कपिलला ट्रोल करत आहेत. यामुळेच कपिलने काही वेळाने त्याचं ट्विट डिलीटही केलं.

दरम्यान घरात ड्रगस सापडल्यावर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना तुरूंगात पाठवण्यात आलं होतं. पण सोमवारी दोघांनाही १५ हजार रूपयांच्या बॉन्डवर जामीन देण्यात आला. एनसीबीने भारती आणि तिच्या पतीला शनिवारी अटक केली होती. त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं.
 

Web Title: Kapil Sharma did the body shaming of the user trolling Bharti Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.