महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतो कपिल शर्मा, जाणून घ्या त्याच्या संपत्तीचा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 20:03 IST2023-05-18T20:01:33+5:302023-05-18T20:03:26+5:30
आज कपिल शर्मा हा टीव्ही जगतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे.

महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतो कपिल शर्मा, जाणून घ्या त्याच्या संपत्तीचा आकडा
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma ) रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल त्याच्या शोच्या माध्यमातून करतो. सर्वसमान्य कुटुंबातून आलेला कपिल त्याच्या मेहनतीने आज सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत सामिल झाला आहे. मोठ्या मेहनतीने कपिलने आज पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवली आहे. आज कपिल शर्मा हा टीव्ही जगतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे.
कोट्यावधीचा मालक बनलेला कपिल एका वर्षामध्ये जवळपास कोटयवधींच्या घरात इनकम टॅक्स भरतो.कपिल शर्मा शोच्या पहिल्या सीजनमध्ये वीकेंड एपिसोडसाठी 60 ते 70 लाख लाखांचे मानधन घ्यायचा. पण आता तो प्रत्येक वीकेंडच्या एपिसोडसाठी एक कोटी रुपये घेतो. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने मानधनात 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
कपिल मुळचा अमृतसरचा आहे. कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. 2006 हे वर्ष कपिलच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. या वर्षात कपिलने ‘हंस दे हंसा दे’ या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला पण संघर्ष सुरुच होता. 2007 साली कपिल ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. यानंतर कपिलने अनेक शो केले अनेक अवार्ड शो होस्ट केलेत. पण संघर्षाच्या काळात कधीच हार मानली नाही. 2010-2013 या काळात ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये तो झळकला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले.
प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच कॉमेडीयन कपिल शर्मा घर असंच आलिशान आहे. आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. कपिलकडे मुंबईमध्ये एक खूप महागडा फ्लॅट आहे. त्याची किंमत 15 कोटी रुपये इतकी आहे.
कपिलकडे लग्जरी मर्सिडीज कार आहे, ज्याची किंमत 1.19 कोटी रुपये आहे. - मर्सिडीजव्यतिरिक्त त्याच्याकडे Volvo XC सुद्धा आहे. त्याच्या कारची किंमत 90 ते 1.3 कोटींच्या जवळ जवळ आहे. - पंजाबमध्ये कपिल शर्माकडे एक प्रशस्त बंगला आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा आहेत. या बंगल्याची किंमत 25 कोटी रुपये आहे.