'द कपिल शर्मा' शो फेम चिंकी-मिंकीचं झालं स्वप्न साकार; मुंबईत घेतलं हक्काचं घर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 05:04 PM2024-07-11T17:04:35+5:302024-07-11T17:06:36+5:30

'द कपिल शर्मा' शो फेम चिंकी-मिंकी म्हणजेच अभिनेत्री सुरभि आणि समृद्धी मेहरा या जुळ्या बहिणींनी स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे.

kapil sharma show fame actress surbhi and samriddhi mehra buy new house in mumbai photo viral | 'द कपिल शर्मा' शो फेम चिंकी-मिंकीचं झालं स्वप्न साकार; मुंबईत घेतलं हक्काचं घर 

'द कपिल शर्मा' शो फेम चिंकी-मिंकीचं झालं स्वप्न साकार; मुंबईत घेतलं हक्काचं घर 

Surbhi And Samriddhi Mehra : 'द कपिल शर्मा' शो फेम चिंकी-मिंकी म्हणजेच अभिनेत्री सुरभि आणि समृद्धी मेहरा या जुळ्या बहिणींनी स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. 

'द कपिल शर्मा' या शोच्या माध्यमातून चिंकी-मिंकीने नाव कमावलं. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट करत त्यांनी स्टारडम मिळवला. रिल्सच्या माध्यमातून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.  आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

नुकतंच सुरभि आणि समृद्धी या बहिणींनी आपलं स्वप्न साकार केलं आहे. मुंबईत त्यांनी आपल्या हक्काचं घर खरेदी केलं आहे. घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपला आनंद व्यक्त केलाय. ७ जुलैच्या दिवशी सुरभि-समृद्धी यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला. 

घराचं नाव ठेवलं 'सुकून'-

चिंकी-मिंकीने म्हणजेच  सुरभि-समृद्धी यांनी त्यांच्या नव्या घरातील पूजा करतानाचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद  केले आहेत. शिवाय फोटो शेअर करताना त्यावर त्यांनी, "सुकून में कदम रखा सुकून सें..." असं कॅप्शन देत नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे. आमचं स्वत: चं घर असं लिहताना आमच्या डोळ्यात अश्रू तरळले. असं म्हणतात ना, 'मेहनतीचं फळ गोड असतं इतकं गोड असतं ते आज कळालं'. घरात पहिलं पाऊल ठेवताच प्रसन्न वाटलं  त्यामुळे नवीन घराचं नाव 'सुकून' ठेवलं. 

चिंकी-मिंकीची व्हायरल पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्यांच कौतुक केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देत एक नेटकरी म्हणाला, "मी तुम्हा दोघींसाठी फारच आनंदी आहे". तसंच आणखी एकाने "सुकूनसाठी तुमचं अभिनंदन आणि तुम्ही दोघीही फार सुंदर दिसताय". अशी कमेंट  केली आहे. 

Web Title: kapil sharma show fame actress surbhi and samriddhi mehra buy new house in mumbai photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.