The Kapil Sharma Show :संघर्षाच्या दिवसांत नवाजुद्दीन सिद्दीकीने कोथिंबीरही विकली...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 01:31 PM2019-01-20T13:31:36+5:302019-01-20T13:33:06+5:30
कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ सध्या धूम करतोय. या शोच्या आज २० जानेवारीला प्रसारित होणा-या एपिसोडमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अमृता राव हजेरी लावणार आहेत. यादरम्यान नवाज व अमृता दोघेही आपल्या ‘ठाकरे’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतील.
कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ सध्या धूम करतोय. या शोच्या आज २० जानेवारीला प्रसारित होणा-या एपिसोडमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अमृता राव हजेरी लावणार आहेत. यादरम्यान नवाज व अमृता दोघेही आपल्या ‘ठाकरे’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतील. ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर नवाजने आपल्या आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केलेत. संघर्षाच्या काळात कोथिंबीर विकल्याचे आणि भाजीपाला विक्रेत्यांसोबत पंगा घेतल्याचेही त्याने सांगितले.
Nawazuddin Sidhique shares an interesting incident on #TheKapilSharmaShow tonight! Find out the story at 9:30 PM only on Sony.@KapilSharmaK9@trulyedward@kikusharda@haanjichandan@Krushna_KAS@bharti_lalli@sumona24@RochelleMRao@Nawazuddin_Spic.twitter.com/bVASHt4Vk2
— Sony TV (@SonyTV) January 20, 2019
त्याने सांगितले की, त्या दिवसांत मी कोथिंबीरही विकली. एकदा मी एकाकडून २०० रूपयांची कोथिंबीर घेतली व ती विकायला निघालो. पण काही तासांत मी खरेदी केलेली कोथिंबीर पिवळी पडू लागली. मग मी पुन्हा ज्याच्याकडून ती खरेदी केली होती, त्याच्याकडे गेलो आणि ही कोथिंबीर तू परत घे, असे त्याला म्हणालो. त्याने नकार दिला आणि मग मी त्याच्यासोबत भांडत बसलो. सरतेशेवटी कोथिंबीर हिरवी ठेवायची तर त्यावर पाणी मारत राहा, असा सल्ला त्या भाजीविक्रेत्याने मला दिला. पण तोपर्यंत सगळी कोथिंबीर सुकून पिवळी झाली होती. माझ्याकडचे २०० रूपयेही संपले होते. खिशात एक पैसा नसताना मी विनातिकिट लोकलने मीरा रोडवर असलेल्या माझ्या घरी आलो, असे नवाजने यावेळी सांगितले.
After a stressful week, #TheKapilSharmaShow is back to entertain and make you laugh! Tune in tonight at 9:30 PM@KapilSharmaK9@trulyedward@kikusharda@haanjichandan@Krushna_KAS@bharti_lalli@sumona24@RochelleMRaopic.twitter.com/9d4IGlKb6w
— Sony TV (@SonyTV) January 20, 2019
आणखी एक मजेशीर किस्साही त्याने शेअर केला. तो म्हणाला की, एकदा ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून मला ४००० रूपये मिळाले होते. यातले २००० रूपये मी माझ्या कोर्डिनेटरला दिलेत आणि १८०० रूपये हॉटेलात उडवले. उरले २०० तर ते आॅटोरिक्षाच्या भाड्यात गेलेत. माझा खिसा पुन्हा खाली झाला आणि दुसºया दिवशी पुन्हा संघर्ष सुरु झाला. ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.